गृहवाटिकेची आवड वाढल्यानंतर, घरच्या झाडांबरोबर मैत्री झाल्यानंतर, बऱ्याचजणांना गृहवाटिकेचा विस्तार वाढवायला आवडेल. अर्थात नवीन झाडे लावावीशी वाटतील. अशा वेळी नेहमीच नर्सरीमध्ये जाऊन झाडे आणण्याची आवश्यकता भासू नये. घरच्या घरी आपल्याला रोपे करता आली आहिजेत.

goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

एखाद्या झाडापासून नवीन रोप तयार करण्यासाठी त्या झाडाचा कोणता भाग उपयोगी आहे, हे माहिती असणे आवश्यक आहे. काही झाडे फांद्यांपासून, काही बियांपासून, काही मुळांपासून तर काही पानांपासून करता येतात. प्रत्येक भाग कसा वापरायचा हे माहीत झाले की दुसरे झाड आपण घरच्या घरी करू शकतो. त्यासाठी नर्सरीत जाण्याची गरज पडत नाही. तसेच एखादे झाड काही कारणामुळे मरणार असे वाटले तर लगेचच, ते जिवंत असतानाच, आपण त्यापासून दुसरे झाड तयार करण्याची तजवीत करू शकतो.

फांदीपासून नवीन रोपे

ज्या झाडांची नवीन रोपे फांद्यांपासून तयार होतात अशा झाडांच्या फांद्या कापल्यानंतर, त्या आपण नवीन रोप तयार करण्यासाठी वापरू शकतो. यासाठी अगदी कोवळी किंवा खूप जून फांदी वापरू नये. त्यामुळे सर्वसाधारणपणे कापलेल्या फांदीचा मधला भाग घ्यावा. फांदी साधारणपणे ६ ते ८ इंच लांबीची असावी. ६ ते ८ इंच लांबीच्या फांदीला ४ ते ५ पेरे अपेक्षित आहेत. पेर म्हणजे पान फांदीला जिथे चिकटलेले असते तो पॉइंट. पेराजवळ डोळा, असतो. ज्यातून नवीन फांदी फुटते, तयार होते. तसंच पेराजवळूनच फांदीला मुळे पण फुटतात. नवीन झाड तयार करण्यासाठी फांदी मातीत लावावी. म्हणजेच ती मातीत खोचावी. मातीत गेलेल्या पेरांना मुळे फुटतील आणि वरील पेरांमधून नवीन पाने येतील. यासाठी किमान २-३ पेरे मातीत जातील असे बघावे. फांदी मातीत लावताना, मातीत जाणाऱ्या पेरांजवळील पाने कापून टाकावी. फांदी मातीत थेट न खोचता प्रथम लोखंडी सळई किंवा एखादी काठी मातीत खुपसून फांदी लावण्याची जागा मोकळी करावी आणि सळई मातीतून काढून त्या जागी फांदी लावावी. फांदी मातीत थेट खुपसली तर फांदीच्या खालच्या पेरांना ईजा पोहोचते.

फांदीपासून येणारी काही फुलझाडे:

तगर, अनंत, बोगनवेल, जास्वंद, अेक्झोरा, मोगरा, गुलाब, ऑफिसटाइम, रातराणी, सर्व रंगाचे क्रोटन (शोभेचे झाड) इ.

बीपासून नवीन रोपे

बी लावताना ती मातीत किती खोल लावायची हे माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळा लावलेल्या बिया उगवत नाहीत. प्रत्येक बीचा आकार आणि आकारमान वेगळे असते. तुळशीचे बी अगदी बारीक असते तर वाटाणा, वाल चांगलाच मोठा असतो. बी लावताना त्यावर जी माती असेल, त्या मातीच्या थराची जाडी बीच्या जाडीच्या जास्तीत जास्त तिप्पट असावी. त्यापेक्षा जास्त नको. याचाच अर्थ तुळशीचे बी/मिरची, टोमॅटो इ.च्या बियांवर माती अगदी थोडीशीच भुरभुरावी. तर वाटाण्यावर १ सेंमी. जाडीचा मातीचा थर चालेल. मातीचा थर जास्त झाला आणि तो फोडून जर बी वर येऊ शकत नसेल तर बी उगवणार नाही. त्यामुळे साधारणपणे बीच्या आकाराच्या दुपटी एवढाच मातीचा थर बीवर असावा.

बीपासून येणारी काही झाडे-

१) गोकर्ण २) अबोली ३) झेंडू ४) सदाफुली ५) तुळस ६) गुलबक्षी ७) तेरडा ८) कॉसमॉस ९) सूर्यफूल १०) मखमली कोंबडा.

कंद-मुळांपासून नवीन रोपे

सोनटक्का, कर्दळ, लिली, इ.ची नवीन रोपे त्यांच्या कंदांपासून करता येतात. एका कंदाला झाड येऊन फुले आल्यानंतर त्याची वाढ होते आणि नवीन रोप त्याला फुटते. हे नवीन रोप दुसरीकडे लावायचे असल्यास जुन्या झाडाची फुले फुलून गेल्यानंतर, लोखंडी सळी आणि पट्टीच्या साहाय्याने तो कंद मातीतून मोकळा करावा आणि नवीन रोपाच्या पानांखाली असलेल्या कंदासकट तो जुन्या कंदापासून हाताने मोडून मोकळा करावा, कापू नये. मोडून मोकळा केल्याने झाडाच्या दृष्टीने योग्य ठिकाणीच तो तुटतो. हा कंद मातीत लावताना पूर्णपणे मातीने झाकला जाईल इतका खोल खड्डा करून त्यात ठेवावा आणि मातीने पूर्णपणे झाकावा. नवीन फुटलेले रोप सगळ्या पानांसकट जमिनीच्या वर असावे.

कंदापासून येणारी काही झाडे-

१) सोनटक्का २) कर्दळ ३) लिली ४) रजनीगंधा ५) मे-फ्लॉवर ६) रंगीत अळू ७) भाजीचे अळू ८) आले ९) वेखंड १०) हेलिकोनिया.

पानांपासून नवीन रोपे

नवीन रोपांसाठी काही झाडांची पाने जमिनीत लावावी लागतात. सर्वसाधारणपणे या झाडांच्या पानांच्या कडेला असणाऱ्या खाचांमधून नवीन फूट येते आणि मुळेही फुटतात. पानांची जाडी अगदीच कमी असल्यामुळे पाने लावताना, पान जमिनीवर आडवे ठेवावे. त्यावर पानांच्या खाचा झाकल्या जातील अशा रीतीने मातीचा पातळ थर द्यावा. पाणी घालताना माती धुऊन जाणार नाही याची काळजी घ्यावी.

पानांपासून येणारी काही झाडे-

१) ब्रह्मकमळ २) पानफुटी

फांद्या, बिया, कंद यांच्या देवाणघेवाणीतून झाडांबरोबरच आपल्याला नवीन मित्र-मैत्रिणीदेखील मिळतात. तेव्हा झाडांसाठी नेहमी नर्सरी नक्कीच नको