News Flash

वसईत ६० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

छाप्यात २० हजार रुपर्ये  किंमतीचे ६० किलो पनीर जप्त केले.

वसई : वसई पूर्वेतील गोखिवरे येथील परिसरात भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या डेरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत हजारो रुपयांचे भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले आहे.

वसई पूर्वेतील गोखिवरे परिसरात असलेल्या ओम साईनाथ नावाच्या दुग्धजन्य पदार्थांच्या डेरीत भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पनीर बनवून त्याची विक्री केली जात होती. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवारी ओमसाईनाथ डेरीवर छापा टाकला.

छाप्यात २० हजार रुपर्ये  किंमतीचे ६० किलो पनीर जप्त केले. यावेळी पनीर तयार करण्यासाठी वापरण्यात  स्कीममिल्क पावडर आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले. त्यांचे नमुने घेऊन नंतर ते नष्ट करण्यात आले आहे. नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होत नाही तोवर डेरी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 1:44 am

Web Title: seized adulterated cheese milk product in vasai akp 94
Next Stories
1 केंद्रीय पथकाची भिवंडीत पाहणी
2 ठाण्यात प्राणवायूअभावी रुग्णांचे स्थलांतर
3 ‘केडीएमसी’ आयुक्तांच्या बदलीसाठी पालकमंत्री आग्रही
Just Now!
X