पालिका निवडणूक सुरू असतानाच ही पाणीकपात लागू झाली तर मतदारांना कोणत्याही तोंडाने सामोरे जायाचे अशी भीती राज्यातील सत्तेत असलेल्या सेना, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. ही पाणीकपात किमान काही दिवस पुढे ढकलावी यासाठी काही स्थानिक पदाधिकारी मंत्रालयस्तरावर प्रयत्नशील असल्याचे समजते.
पालिकेने पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाणीकपातीबाबत सध्या तरी विचार सुरू नाही. धरणातील पाणीसाठा, पावसाचे कमी असलेले प्रमाण याचा विचार करून पाणीकपातीबाबत चर्चा सुरू आहेत. याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
– तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग