08 July 2020

News Flash

गाडीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

तन्मय वेतकर या युवकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील घोडबंदर रस्ता येथील आनंदनगर बस थांब्याजवळ तन्मय वेतकर (१८) या युवकाने नॅनो कारने अप्पुस्वामी चामी (६१) यांस धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी युवकावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आले नाही.
तन्मय वेतकर या युवकाने (एम. एच. ०१ बीबी ५२४९) नॅनो कारने रविवारी दुपारच्या सुमारास अप्पुस्वामी चामी यांस जोरदार धडक दिली. या वेळी जास्त जखमी झाल्याने चामी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तन्मय वेतकर या युवकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2015 12:02 am

Web Title: senior citizen death in car accident
Next Stories
1 सूरज परमार आत्महत्या प्रकरणी चारही आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर
2 हॉटेलमध्ये कार्डद्वारे बिल देताना सावधान!
3 कलंकित वस्तीतील होतकरूंच्या पंखांना पोलिसांचे बळ!
Just Now!
X