बनावट फेसबुक खाते बनवून तरुणींची फसवणूक; नालासोपाऱ्यातील तरुणाला अटक

सोशल नेटवर्किंगद्वारे मॉडेलिंगच्या कामाचे आमिष दाखवून तरुणींचे लैंगिक शोषण करण्याचे धक्कादायक प्रकरण नालासोपाऱ्यात उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन तरुणींच्या तक्रारी आतापर्यंत समोर आल्या असून पोलिसांनी या तरुणाला अटक केलीे आहे. फेसबुकवरून बनावट खाते उघडून आरोपी मुलींना जाळ्यात फसवायचा आणि नंतर त्यांचे अश्लिल छायाचित्रे काढून त्यांचे लैंगिक शोषण करायचा.

तरुण मुलामुलींना सिनेसृष्टीचे आणि ग्लॅमरचे वेड असते. त्यासाठी ते धडपडत असतात. त्याचाच फायदा घेऊन त्यांचे आर्थिक आणि शारिरीक शोषण करण्याचे काम नालासोपारा येथीेल रिंकू यादव (२५) हा आरोपी करत होता. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिलेल्या माहितीनुसार रिंकू हा संतोष भुवन येथे राहतो. त्याने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले होते. त्याद्वारे तो मॉडेल कोऑर्डिनेटर असल्याचा भासवत असे. तरुण मुलींना जाहिराती व सिनेमात काम मिळवून दिल्याचे त्याने फेसबुकवर लिहिले होते. त्यासाठी काही मुलींच्या बनावट अकाऊंट तयार करून त्यांना काम मिळवून दिल्याचा दावा केला होता. या मुलींनीही रिंकूमुळे काम मिळाल्याचे सांगितले होते. वास्तविक त्या मुलींचे फेसबुक अकाऊंटही बनावट होते आणि त्या अकाऊंटवर रिंकू त्यांना काम मिळवून दिल्याचे भासवत होता.

त्याच्या या बनावट फेसबुक अकाऊंटला अनेक मुलीे फसल्या होत्या. ज्यांना काम हवे असेल, त्यांनी संपर्क साधावा असे सांगून त्याने आपला मोबाइल क्रमांक या फेसबुक अकाऊंटवर टाकला होता. या प्रकरणात फसवल्या गेलेल्या एका मुलीेने बुधवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिलीे. फिर्यादी मुलगीे १९ वर्षांंचीे असून तीे नालासोपाऱ्यात राहते. तिने यादवच्या फेसबुकला संपर्क केला होता. रिंकूने या मुलीकडे ५० हजार रुपयांचीे मागणीे करून तिला निर्मळ येथे बोलावले. मॉडेलिंगसाठी काही छायाचित्रे काढावे लागतील,  असे सांगून तिला कळंब येथीेल एका लॉजवर नेले. तिथे फोटोशूटच्या नावाखालीे या मुलीचे अश्लिल छायाचित्रे काढली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास ही छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याचीे धमकी दिलीे. या मुलीेने बुधवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी यादवला अटक केलीे. त्याच्या चौकशीेत अनेक मुली बळी पडल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणीे सोपाऱ्यातच राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीनेही यादवने फसविल्याची तक्रार दिलीे आहे. तुळींज पोलिसांनी बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात यादवला अटक केली आहे. दुसऱ्या प्रकरणातीेल अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार यादववर पोक्सो ( बाललैंगिक शोषण विरोधी कायदा) नुसारही गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मुलींचे काढलेली अश्लिल छायाचित्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

पोलिसांचे आवाहन

ज्या मुलींना यादव याने फसवले असेल त्याने तुळींज पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन तुळींज पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे यादव हा बेरोजगार असून त्याचा सिनेसृष्टिशीे काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

यादव हा बेरोजगार आहे. त्याने बनावट फेसबुक खाते बनवून मॉडेलिंगचे काम दाखवत मुलींना फसवत होता. आमच्याकडे आतापर्यंत दोन तक्रारी आल्या असून आम्ही त्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत.

– प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज