कारागृहातच ठेवण्यासाठी पोलीसांची तयारी
ठाणे येथील नितीन कंपनी जंक्शनवरील भर चौकात वाहतूक शाखेच्या एका महिला कर्मचारीला मारहाण करणारा शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे
याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न तसेच अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या माहितीच्या आधारे त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्याची तयारी ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामध्ये यापूर्वीच्या गुन्ह्य़ातील त्याचा जामीन रद्द करून त्याची कारागृहात रवानगी करण्याची विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महिला पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरणात ठाणे न्यायालयाने कालदुडे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. मात्र, ठाणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने त्याला सोमवापर्यंत जेल कोठडीत ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी त्याची यापूर्वीची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासली असून त्यामध्ये त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न तसेच अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, धारधार शस्त्राने हल्ला तसेच बेकायदेशीर जमाव व दंगल आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

lok sabha election 2024 level of promotion in Beed fell to caste of chief officers
बीडमधील प्रचाराचा स्तर प्रमुख अधिकाऱ्यांच्या जातीपर्यंत घसरला
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हेच आजच्या भारतीय लोकशाहीचे वास्तव
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा