ग्रामीण भागातील मतदारांचा भाजपकडून बुद्धिभेद केला जात आहे. संघर्ष समिती तिच्या अस्तित्वासाठी लढत आहे. भाल येथे विस्तीर्ण भूखंडावर क्षेपणभूमीचे आरक्षण मुंबई महानगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष असलेल्या मुख्यमंत्र्यांनी टाकले. एकेकाळचे हाडामासाचे राजकीय वैरी एकत्र येऊन शिवसेनेविरोधात लढत आहेत, अशी टीका ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी २७ गावांतील प्रचार सभेदरम्यान केली.

लोढा निळजे येथे प्रचार सभेत ते बोलत होते. महानगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष मुख्यमंत्री स्वत: आहेत. हे आरक्षण टाकताना भाजपच्या नेत्यांना २७ गावांमधील रहिवाशांच्या त्रासाचा विसर पडला होता का, असा सवालही िशदे यांनी उपस्थित केला. तेव्हा आरक्षण टाकायचे आणि निवडणुकीच्या प्रचारात वेगळीच भूमिका घ्यायची असा दुटप्पीपणा भाजपच्या नेत्यांनी अवलंबिला आहे. या गावांमधील जनता सुजाण असून शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.