12 November 2019

News Flash

शिवसेनेचा बुलेट ट्रेनचा विरोध मावळला

आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव

(संग्रहित छायाचित्र)

आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव

ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला विरोध करत आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचा विरोध मावळला आहे. शिवसेनेने  म्हातार्डी येथे स्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा  करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

बुलेट ट्रेनचा मार्ग आणि स्थानकासाठी आवश्यक असणाऱ्या जागेच्या आरक्षण फेरबदलांचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे यापूर्वी हा प्रस्ताव विषयपत्रिकेवर घेतला नव्हता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा विरोध मावळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बुलेट ट्रेनसाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील ३६.६२ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र ही जागा विकास आराखडय़ात विविध प्रकल्पांसाठी आरक्षित असल्यामुळे आरक्षणांमध्ये फेरबदल करावे लागणार आहेत. या संदर्भात राज्य शासन स्तरावर एक बैठकही झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महापालिकेने जागा आरक्षण फेरबदलांचा प्रस्ताव तयार केला होता आणि तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीला आणण्यासाठी महापौरांकडे पाठविला होता. मात्र या प्रकल्पास विरोध असल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव सभेच्या विषयपत्रिकेवर घेतला नव्हता. आता शिवसेनेने १९ जूनच्या सर्वसाधारण सभेपुढे तो  मंजुरीसाठी आणला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या ट्रेनच्या मार्गासाठी गावांमधील १९.४९ हेक्टर तर स्थानकाच्या उभारणीसाठी म्हातार्डी गावातील १७.१३ हेक्टर इतके भूसंपादन करावे लागणार आहे.

First Published on June 15, 2019 1:37 am

Web Title: shiv sena bjp bullet train