लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्तद्रव उपचार पद्धती महत्त्वाची ठरत आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात प्लाझ्मा दान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. करोनामुक्त दात्यांनी जास्तीत जास्त संख्येने या केंद्रात येऊन प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न

करोनामुक्त रुग्णाच्या रक्तातील रक्तद्रवात प्रतिकारशक्ती (अ‍ॅण्टीबॉडी) तयार होतात. त्यामुळे हे रक्तद्रव करोनाबाधित रुग्णाला दिल्यास त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते. त्यामुळे ठाणे पालिका प्रशासनातर्फे रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात करोना रुग्णांसाठी रक्तद्रव दान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या कामासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हिड-१९च्या खात्यातून अर्थसाहाय्य मिळाले आहे. तसेच या सुविधेसाठी केंद्रीय आणि राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवानगी मिळालेली आहे.

ठाणे परिसरात असलेल्या सरकारी रुग्णालयातील करोना रुग्णांसाठी ही सेवा नि:शुल्क पुरवण्यात येत आहे. मात्र खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी ही सेवा शासकीय नियमानुसार शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रक्तपेढी विभागप्रमुख डॉ. शिवकुमार कोरी यांच्या सहकार्याने रक्तपेढी विभागामार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महापालिकेचे आवाहन

करोनामुक्त झालेल्या व्यक्तीची उपचारानंतर आरटी-पीसीआरची चाचणी निगेटिव्ह आल्यापासून २८ दिवसांनंतर आणि ४ महिन्यांपूर्वीपर्यंत ती व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. करोना संसर्गातून बरे झालेल्या प्लाझ्मा दात्यांची चाचणी करण्यात येते. ‘प्लाझ्मा‘मध्ये प्रतिकारशक्ती योग्य प्रमाणात असल्यास त्यांचे प्लाझ्मा रुग्णाला दिले तर रुग्णाच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत जास्त करोनामुक्त दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.