21 September 2020

News Flash

ठाण्यातील दुकाने आता सातही दिवस खुली 

मॉल, वाणिज्य संकुल, व्यायामशाळा आणि तरण तलाव खुले करण्याबाबत आद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही

(संग्रहित छायाचित्र)

सम-विषम नियमामुळे महिन्यातील निम्मेच दिवस सुरू असणारी ठाणे शहरातील दुकाने शनिवारपासून आठवडय़ातील सातही दिवस सुरू राहतील. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिका अधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सुचना व्यापाऱ्यांना बैठकीत देण्यात आल्या. सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत शहरातील सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मॉल, वाणिज्य संकुल, व्यायामशाळा आणि तरण तलाव खुले करण्याबाबत आद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 12:32 am

Web Title: shops in thane are now open for seven days abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पहिल्या ऑनलाइन महासभेत नगरसेवकांच्या केवळ गप्पाच   
2 भाजप नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र बोगस
3 भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामात अडथळे
Just Now!
X