News Flash

गुन्हेवृत्त : ठाण्यात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

आंबेडकर रोड परिसरात राहणाऱ्या ठाकूर या वंदना एसटी स्थानकाजवळ मंगळवारी रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचली.

| March 5, 2015 12:01 pm

* आंबेडकर रोड परिसरात राहणाऱ्या ठाकूर या वंदना एसटी स्थानकाजवळ मंगळवारी रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचली.
* डोंबिवली येथे राहणाऱ्या लता नवनाथ म्हात्रे (४५) या मंगळवारी कळव्यातील पारसिकनगर भागात आल्या होत्या. तेव्हा नेचर ग्लोरी सोसायटीच्या आवारातून मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी म्हात्रे यांच्या गळ्यातील दोन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचले.
* अहमदनगर येथे राहणाऱ्या मुमताजबी लालखान पठाण (५०) मंगळवारी काही कामानिमित्त कल्याणात आल्या होत्या. तेव्हा श्रीदेवी रुग्णालयाजवळ मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी पठाण यांची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचली.
* ठाण्यातील शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या शरयू रघुवीर नाईक (६०) यांचे मंगळवारी उन्नती गार्डन संकुलासमोर मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचले. वसंतविहार भागात राहणाऱ्या विजया धनशेट्टी (५४) यांचे हिरानंदानी बस थांब्याजवळ २४ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरले. या गुन्ह्य़ांप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

तरुणाचा मित्रावर चाकूहल्ला
ठाणे :  सुभाषनगर येथील होमऑफ फेथ इंग्रजी शाळेजवळ राहणाऱ्या विकास शहा (१७) याच्यावर साईराम सुब्रमण्यम थेवर याने मंगळवारी चाकूने हल्ला केला. पाणी फेकण्यावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन साईराम याने चाकूने विकासवर हल्ला करुन त्यास जखमी केले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणात दोन घरफोडय़ा
कल्याण : न्यू गणेशनगर येथील नेतिवली भागात राहणाऱ्या नरेंद्र पाठक (३७) यांच्या घरी मंगळवारी चोरी झाली. दरवाज्याचा कडी कोयंडा कापून चोरटय़ाने पाठक यांच्या घरात प्रवेश केला आणि एक लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. दुसऱ्या घटनेत सोमवारी पत्रकार अभिजित अशोक देशमुख (३०) यांच्या घराची खिडकी उघडून चोरटय़ाने सोन्याचांदीचे दागिने, रोख, घडय़ाळ, कॅमेरा, भ्रमणध्वनी असा ३८ हजार नऊशे रुपये किमतीचा ऐवज चोरला. या दोन्ही गुन्ह्य़ांप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोलशेत भागात कारचोरी
ठाणे : कोलशेत रोड येथील एवरेस्टवर्ल्ड इमारतीत राहणाऱ्या शंकर सुरेश रामरख्यानी (३०) यांची त्यांच्या इमारतीसमोरील रस्त्यावर उभी केलेली दोन लाख ७५ हजार रुपये किमतीची चारचाकी गाडी सोमवारी चोरटय़ाने चोरली. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दोघांना लुटले
ठाणे : भिवंडी येथील अंजुरफाटा परिसरात राहणारे चतुरी चौधरी (५६) व त्यांचा पुतण्या रामलाल याला ठाणे रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी तीन अज्ञात इसमांनी लुटले. ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील फलाट क्रमांक एक जवळील तिकीट खिडकीसमोर चौधरी यांना चोरटय़ांनी तिकीट काढून देतो, असे सांगून बोलण्यात गुंतवले आणि त्यानंतर ठाणे एस.टी. स्थानक भागात नेऊन बॅगेतील ७५ हजार लुटून पोबारा केला. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 12:01 pm

Web Title: short crime news from all over thane 9
Next Stories
1 एकटय़ाने धुळवड खेळा, स्वाइन फ्लू टाळा!
2 ठाणे तिथे.. : मनी ‘मानसी’ गुंजते!
3 अंबरनाथ शहरबात : राजकीय सोंगे अन् नागरी सुविधांचा शिमगा
Just Now!
X