X
निवडणूक निकाल २०१७

डोंबिवलीमध्ये सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर परिसरात आपल्या दोन भावंडासह ही पीडित मुलगी राहाते.

भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुन्हा एकदा डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात घडली. गेल्या तीन महिन्यापासून सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात पीडित अल्पवयीन मुलीने सोमवारी मध्यरात्री रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्यास २९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासामध्ये या आरोपीने पाच वर्षांपूर्वी स्वत:च्या आईची हत्या केली असून त्याबद्दल तो बालसुधारगृहातही जाऊन आला असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर परिसरात आपल्या दोन भावंडासह ही पीडित मुलगी राहाते. गेल्या तीन महिन्यापासून तिचा मोठा भाऊ तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. मी तुझी बहीण आहे असे वागू नको, अशी विनवणी करूनही चाकूच्या धाकाने हा तरुण तिच्यावर अत्याचार करत होता. अखेर या पीडित मुलीने धाडस करून मैत्रिणीच्या आई-वडिलांसह सोमवारी रात्री रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत भावाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून २९ सप्टेंबपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First Published on: September 23, 2015 12:05 am
  • Tags: sexual-abuse, sexual-harassment,
  • Outbrain