लिफ्टमध्ये अडकून सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वसई पूर्वेला ही घटना घडली आहे. सातीवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली टॉवरमधील लिफ्टमध्ये अडकून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर परिसरारत हळहळ व्यक्त केली जात आहे.