19 October 2019

News Flash

सोळा वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने सुरज वॉटर पार्कमध्ये मृत्यू

दीपकच्या नातेवाइकांनी या सगळ्या प्रकारात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे

सुरज वॉटर पार्क संग्रहित छायाचित्र

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत शालेय सहली जाण्याचे प्रमाण मोठे असते. अशात ठाण्यातील सुरज वॉटर पार्क या ठिकाणी नालासोपारा येथील नवजीवन शाळेची सहल आली होती. या शाळेत शिकणारा सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा सुरज वॉटर पार्कमध्ये हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी ठाण्यात ही घटना घडली आहे. दीपक चंद्रकांत गुप्ता असे या मुलाचे नाव आहे अशी माहिती समजते आहे. त्याच्या मृत्यूची घटना घडली ज्यानंतर संतप्त पालकांनी शनिवारी शाळेबाहेर निषेध मोर्चा काढला.

नालासोपारा येथील नवजीवन स्कूल ऑफ नालासोपारा मध्ये दीपक चंद्रकांत गुप्ता ( वय-१६) हा मुलगा इयत्ता दहावीत शिकत होता. या दरम्यान शाळेची सहल सुरज वॉटर पार्क, ठाणे येथे नेण्यात आले होती. यावेळी दीपकला अचानक चक्कर आली आणि तो जागीच खाली पडला. त्यानंतर त्याला ठाणे येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात दीपकला हृदय विकाराचा झटका आला. या प्रकरणी ठाणे येथील कासार वडवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

१६ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. एवढ्या कमी वयात हृदयविकाराचा झटका आल्याने दीपकचा नातेवाइकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

First Published on January 12, 2019 7:02 pm

Web Title: sixteen year old boy dies because of heart attack in suraj water park thane