16 December 2017

News Flash

खाऊखुशाल : इंडो-काँटिनेंटल पदार्थाची मेजवानी

घोडबंदर रोड येथे असाच एका स्मोकिज इटिन गुड हा फूड ट्रक नुकताच खवय्यांच्या सेवेत

जतीन तावडे | Updated: May 20, 2017 1:50 AM

इंडो-काँटिनेंटल पदार्थाची मेजवानी

ठाणे हे पूर्वापार एक बहुभाषिक, बहुधर्मीय शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथील समाजजीवनात विविधतेतून एकतेचा प्रत्यय येतो. खाद्यसंस्कृतीही त्याला अपवाद नाही.  शहराच्या खाद्यसंस्कृतीत सध्या नव्यानेच आलेल्या इंडो-वेस्टर्न, इंडो-इटालियन, इंडो-काँटिनेंटल अशा अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थाच्या चवीने आपल्याकडील खवय्यांना भुरळ पाडली आहे. देशी- विदेशी पदार्थाची चव घेणे हा जणूकाही खवय्यांचा आवडता छंदच असतो. त्यामुळे शाकाहारी असो वा मांसाहारी पदार्थ मनसोक्त खाणे हे भारतीयांचे वैशिष्टय़ आहे. विशेष म्हणजे देशी पदार्थाबरोबरच विदेशी पदार्थानीही खवय्यांचे मन जिंकले आहे. विदेशी पदार्थाचे फुड ट्रक्स आणि त्याभोवती असणारी खवय्यांची गर्दी हे त्याचेच द्योतक आहे. घोडबंदर रोड येथे असाच एका स्मोकिज इटिन गुड हा फूड ट्रक नुकताच खवय्यांच्या सेवेत दाखल झाला आहे.

इंडो-काँटिनेंटल पदार्थाची एक वेगळी चव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रज्वल शेट्टी यांनी ‘स्मोकिज इटिन गुड’ हा फूड ट्रक सुरू केला. ‘स्मोकिज’मध्ये आपल्याला मोमोज, कोलकत्ता रोल, पास्ता, पिझ्झा आणि मॉकटेल्सच्या एकूण १८३ पदार्थाची चव चाखायला मिळते. ‘मोमोज’ म्हणजे सध्याच्या तरुणाईचा आवडता पदार्थ. ‘मोमोज’ हा खरंतर विविध भाज्यांचे मिश्रण करून तयार केलेला आपल्याकडच्या मोदकासारखा एक तिबेटियन पदार्थ. इथे विविध चवींचे शाकाहारी आणि मांसाहरी ‘मोमोज’ मिळतात. ‘खा आणि स्वस्थ राहा’ या उक्तीनुसार या फूड ट्रककडे गेल्यानंतर दोन घास अधिकच खाल्ले जातात. फ्रँकी आणि रोल आदी पदार्थाच्या ठिकाणी खवय्ये नेहमीच गर्दी करताना दिसतात. ‘स्मोकिज इटिन गुड’चे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारे स्मोकिज कोलकत्ता रोल्स. मांसाहारीे नाव काढले की तोंडाला पाणी नाही सुटले तरच नवल. मांसाहारी पदार्थामध्ये इथे आपल्याला चिकन रोल, चिकन एग शेजवान रोल, बटर चिकन एग चीज रोल, चिकन बीबीक्यू रोल, चिकन एग तेरियाकी चीज रोल अशा काही वैविध्यपूर्ण चिकन रोल्सबरोबरच एग चिली मेयॉनीज रोल, एग पनीर रोल, अंडे भाजून ते रोटीमध्ये टाकून तयार केलेले फ्लफी एग फंकी रोल इतकी विविधता उपलब्ध आहे. जे मांसाहारी नाहीत, पण अंड खातात, त्यांना हे अंडय़ाचे रोल्स अधिक  आवडतात. पनीर आणि शाकाहारी रोल्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत.  दरवेळी आपण शाकाहारी रोलमध्ये बटाटय़ाच्या भाजीबरोबर विविध भाज्यांचे मिश्रण केलेलं पाहतो. मात्र येथील शाकाहारी रोल्सचे वैशिटय़ म्हणजे येथे रोल्समध्ये बटाटा वापरलाच जात नाही. बटाटय़ाऐवजी येथे झुचिनी, बेलपेपर, मका आणि गाजर वापरून रोल्स तयार केले जातात. व्हेज चिली मायो रोल, शाकाहारी चीज

बीबीक्यू, तेरियाकी रोल असे काही शाकाहारी रोल्स इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येथील पनीर बीबीक्यू चीज रोल, पनीर तेरियाकी चीज रोल, माखनीच्या ग्रेव्हीमध्ये पनीर टाकून तयार केलेला पनीर माखनी चीज रोल म्हणजे खाद्यप्रेमींसाठी एक प्रकारची मेजवानीच.

पास्ता, पिझ्झा, गार्लिक ब्रेडसारख्या पाश्चिमात्य पदार्थाची नावे ऐकली की खवय्यांची भूक चाळवते. त्यातच जर रेड सॉसमधील पास्ता अरेबियाटा किंवा पास्ता अल-  पोमोडोरो, व्हाइट सॉसमधील पास्ता अलफ्रेडो, विविध प्रकारच्या पास्ता सॉसचे मिश्रण करून केलेला मिक्स सॉस पास्ता आणि सॉसची चव न आवडणाऱ्यांसाठी जास्त भाज्या आणि कमी सॉस टाकून तयार केलेला पास्ता सलाड म्हणजे इंडो-काँटिनेंटल मेजवानीच. चीज, ऑलिव्ह्ज, जेलेपिनो, टोमॅटो आणि कांदा टाकून तयार केलेला एक्झॉटिक्स गार्लिक ब्रेड, चीज आणि तिखट पनीरचे टॉपिंग्स असलेला चीझी पनीर गार्लिक ब्रेड असे काही फ्यूजन प्रकारचे गार्लिक ब्रेडही इथे उपलब्ध आहेत. पिझ्झामध्ये तंदुरी पनीर पिझ्झा, तिखट चवीचा स्पेशल व्हेज पिझ्झा, फायरी पनीर पिझ्झा, स्मोकिज डिलाइट पिझ्झा, बीबीक्यू चिकन, फायरी चिकन, स्पायसी जिलेपिनो, कांदा आणि चीज टाकून तयार केलेला यमअप चिकन पिझ्झा असे काही वैशिष्टय़पूर्ण इंडो-काँटिनेंटल पिझ्झाही इथे मिळतात. सध्याच्या या कडक उन्हाळ्यात ज्यूस किंवा काही मॉकटेल ड्रिंक्सच्या शोधात खवय्ये असतात. इथे बिटाचा रस लेमोनेडमध्ये टाकून तयार केलेले चुलबुल लेमोनेड, दररोजच्या लेमोनेडमध्ये मोइतो टाकून तयार केलेला सुपर मुंबई धमाल, काकडीची चव असलेला वैशिष्टय़पूर्ण असा कुकुम्बर आइस टी, ग्रीन अ‍ॅपलची चव असलेला ग्रीन अ‍ॅपल आइस टी, पीच आइस टी  आणि लेमन आइस टी अशा आगळ्यावेगळ्या प्रकारच्या ‘आइस टी’ची नावे ऐकूनच भर उन्हात थंडगार वाटते.

अशा या वैविध्यपूर्ण इंडो-काँटिनेंटल पदार्थ मिळणाऱ्या ‘स्मोकिज इटिन गुड’चे वैशिष्टय़ म्हणजे इथे मिळणारा चॉकलेट मोमोज. चॉकलेट हा आपल्या सर्वाचाच जिव्हाळ्याचा पदार्थ. हॉट लिक्विड चॉकलेट‘मोमोज’मध्ये टाकून तयार केलेले चॉकलेट मोमोज म्हणजे चॉकलेटप्रेमींसाठी पर्वणीच.

स्मोकिज इटिन गुड

कुठे? फॉच्र्युन अ‍ॅव्हेन्यू, ऋतू इस्टेटजवळ, ब्रह्मांड, घोडबंदर रोड, ठाणे (प.)

First Published on May 20, 2017 1:47 am

Web Title: smokeys itin good thane indo continental food