30 September 2020

News Flash

पावसाळ्यात शेतकऱ्यांना सर्पदंशाचा धोका

आरोग्य केंद्रात विषारी दंशावरील औषधांचा साठा करण्याची मागणी

आरोग्य केंद्रात विषारी दंशावरील औषधांचा साठा करण्याची मागणी

वसई : पावसाळ्यात शेतीची कामे करताना विषारी प्राण्यांचा दंश होणाऱ्या व्यक्तीला वेळेवर योग्य लस उपलब्ध होत नसल्यामुळे प्राणास मुकावे लागते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद तथा महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात विषारी दंशावरील आवश्यक लसींचा पुरेसा साठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

पावसाळा सुरू झाला असून वसईच्या पूर्व तसेच पश्चिम पट्टय़ात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. पूर्व पट्टय़ात भातशेती तर पश्चिम पट्टय़ात बागायती शेती तथा केळीची आणि विविध फुलशेतीची लागवड मोठय़ा प्रमाणात होत असते. पावसाळ्यात शेतामध्ये पाणी साठण्याचे प्रमाणही मोठे असते. त्यातच साप, विंचू तथा अन्य सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा शेतामध्ये वावर सुरू होतो. अशा वेळी शेतीची कामे करताना अनेक शेतकऱ्यांना या प्राण्यांचा दंश होतो.

एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश झाल्यास त्याला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र वेळेवर औषध, लस वा योग्य उपचार न मिळाल्यामुळे अशा शेतकऱ्याला प्राणास मुकावे. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिका तथा जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणांनी त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात विषारी प्राण्यांच्या दंशावरील लस तथा अन्य औषधांचा पुरेसा साठा करावा, अशी मागणी पश्चिम पट्टय़ातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पश्चिम पट्टय़ात सर्प तसेच विंचूदंशामुळे अनेक शेतकऱ्यांना केवळ आवश्यक लस वेळेत उपलब्ध झाली नाही म्हणून प्राणास मुकावे लागले आहे. जिल्हा परिषद तसेच महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांनी याची वेळीच दखल घ्यावी.

– गॉडसन रॉड्रिग्ज, स्थानिक शेतकरी, गास

विषारी प्राण्यांच्या दंशावरील लस आणि आवश्यक औषधांचा साठा आरोग्य केंद्रात केलेला आहे. साप, विंचू याशिवाय कुत्रा तसेच मांजरीच्या चाव्यावरील औषधेही आरोग्य केंद्रात आहेत.

– डॉ. मनीषकुमार पांडे, आरोग्य केंद्र, सोपारा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 3:41 am

Web Title: snake bite risk to farmers in rainy season zws 70
Next Stories
1 मीरा-भाईंदर मध्ये रुग्णवाहिकेची कमतरता
2 ठाणे जिल्हा कुलूपबंद!
3 ठाणे : महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात ९ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर
Just Now!
X