25 February 2021

News Flash

ठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत

या घटनेनंतर शहरात मृत पक्षी आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : राज्यातील विविध शहरांपाठोपाठ ठाणे शहरात मृतावस्थेत आढळलेल्या चार पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले असतानाच त्यापाठोपाठ आता शहरांमध्ये दिवसेंदिवस मृतावस्थेत आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या १७ दिवसांत शहराच्या विविध भागांत ४८३ पक्षी मृतावस्थेत आढळले असून मंगळवारी दिवसभरात ५३ पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामध्ये कावळ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

घोडबंदर येथील वाघबीळ परिसरात पंधरा दिवसांपूर्वी आढळलेल्या १५ बगळ्यांपैकी ३ बगळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर शहरात मृत पक्षी आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ३ ते १७ जानेवारी या कालावधीत शहराच्या विविध भागात ४८३ पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामध्ये बगळे २४, कावळे २२४, पोपट ५, कबुतर ८३, कोंबडय़ा १३४, पाण कोंबडी १, बदक १, कोकीळ ४, गिधाड १ यांचा समावेश आहे. तर, मंगळवारी दिवसभरामध्ये शहरात ५३ पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामध्ये कावळे २८, कबुतर २२ आणि कोकीळ ३ यांचा समावेश आहे.

कुठे किती मृत पक्षी?

’ वाघबीळ, कावेसर, कासारवडवली, आनंदनगर, ओवळा भागात : ६१

’ बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, ब्रह्मांड, कापुरबावडी, आझादनगर, हिरानंदानी इस्टेट भागात : ३७

’ तुळशीधाम, कोकणीपाडा, पवारनगर, वसंतविहार, टिकूजीनीवाडी भागात : १५

’ लोकमान्यनगर, सावरकरनगर, यशोधननगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर आणि कोरस भागात : ५५

’ श्रीनगर, किसननगर, वागळे इस्टेट, अंबिकानगर, ज्ञानेश्वर नगर भागात : ३३

’ मनोरुग्णालय परिसर, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर भागात : ८८

’ कोपरी भागात : ५

’ चरई, घंटाळी, नौपाडा, पाचपखाडी, खारकर आळी भागात : १३

’ कोलबाड, खोपट भागात : १३

श्रीरंग, वृंदावन, राबोडी, साकेत, माजिवाडा भागात : २१

कळवा, खारेगाव, मुंब्रा आणि दिवा भागात : १४२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:22 am

Web Title: so far 483 birds have died in thane zws 70
Next Stories
1 १७१९ फेरीवाल्यांना ‘आत्मनिर्भर निधी’
2 ठाणे जिल्ह्य़ात भाजपची सरशी
3 शनिवार, रविवारीही कोपरी पूल बंद
Just Now!
X