30 September 2020

News Flash

‘लोक सत्ता’ प्रस्तुत ‘सुरश्री’ मैफ ल आज ठाण्यात

तीन ज्येष्ठ गायकांची एकत्रित मैफल ठाण्यात पहिल्यांदाच होत आहे.

सुरेश वाडक र, रवींद्र साठे, श्रीधर फ डके यांचा सहभाग

सुरेश वाडकर, रवींद्र साठे, श्रीधर फडके या तीन ज्येष्ठ गायकांनी संगीतप्रेमी रसिकांच्या मनावर गेली अनेक वर्षे गारुड केले असून विविध गाण्यांवर आपापल्या गायन शैलीचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. या गायकांची ‘लोकसत्ता’ प्रस्तुत व स्वरगंधार निर्मित ‘सुरश्री’ मैफल आज २३ ऑक्टोबर रोजी ठाण्यात डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात रंगणार आहे. अपूर्वा प्रॉडक्शनतर्फे रात्री साडेआठ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सुरेश वाडकर, रवींद्र साठे, श्रीधर फडके आपली स्वत:ची गाणी सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील या तीन प्रसिद्ध गायकांच्या नावातील पहिले अक्षर घेऊन कार्यक्रमाचे शीर्षक तयार करण्यात आले असून या तीन ज्येष्ठ गायकांची एकत्रित मैफल ठाण्यात पहिल्यांदाच होत आहे.
कार्यक्रमाची संकल्पना मंदार कर्णिक यांची असून सोनाली कुलकर्णी या सहगायिका म्हणून सहभागी होणार आहेत. अभिनेते विघ्नेश जोशी कार्यक्रमाचे निवेदक आहेत. अपूर्वा प्रॉडक्शनचे सुमुख वर्तक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘ओंकार स्वरूपा’, ‘दयाघना का तुटले’, ‘काळ देहासी आला’, ‘सांझ ढले’, ‘तुमसे मिलके’, ‘सीने मे जलन’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’ (सुरेश वाडकर), ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’, ‘आम्ही ठाकरं ठाकरं’ (रवींद्र साठे), ‘मनमनास उमगत नाही’, ‘त्या कोवळ्या फुलांचा’ (श्रीधर फडके) ही आणि अन्य गाणीसादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका गडकरी रंगायतन व घाणेकर नाटय़गृहात उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी सुमुख वर्तक यांच्याशी ९८६९५५४२६२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2015 12:42 am

Web Title: song concert in thane
टॅग Thane
Next Stories
1 विद्यापीठ उपकेंद्राचे पालघरला वेध
2 आत्महत्येपूर्वी परमार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
3 धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीत सीआरझेडचा अडथळा
Just Now!
X