हिंदी-मराठी गीतांच्या ‘पल पल दिल के पास’ कार्यक्रमातून निधी संकलन

दुर्गम भागामध्ये राहून चांगली शैक्षणिक प्रगती साधणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य करण्याच्या उद्देशाने कल्याणच्या स्पंदन समाजिक संस्थेने ‘पल पल दिल के पास’ या हिंदी-मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमास श्रीरंग भावे, मुग्धा वैशंपायन यांनी गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली.

श्रीरंग भावे यांनी ‘सुर निरागस हो’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. मुग्धा वैशंपायन हिने ‘दे मला गे हे’ हे नाटय़ पद गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर ‘आली कुठुनशी तानी’ तसेच ‘अजून त्या झुडपांच्या मागे’, ‘पल पल दिल के पास’, ही गाणी निनाद आजगावकर यांनी सादर केली. या वेळी संगीता चितळे आणि श्रीरंग भावेने गायलेले ‘दिवाना हुआ बादल’ या गाण्याने तर रसिकांना मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात सादर केलेल्या जुन्या गाण्यांना प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली.

वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करणाऱ्या स्पंदनच्या या  या कार्यक्रमातून मिळालेला निधी गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येईल, असे संस्थेचे पदाधिकारी प्रशांत दांडेकर यांनी सांगितले. ज्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी ९८२०५७८२९८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनदेखील या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले आहे.