ऐतिहासिक आणि नयनरम्य वसईचे दर्शन सुलभ करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव; स्थळांची शास्त्रोक्त माहिती देण्यासाठी ‘गाइड’ची नेमणूक

वसईचे किल्ले, देवस्थाने, विविध समुद्रकिनारे बघायचे आहेत, पण कुठे जायचे आणि कसे जायचे हे माहीत नाही.. पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन वसईत लवकरच पर्यटन बस सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वसईची विविध ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे, पिकनिक स्पॉट आदींची सफर ही बस घडवून आणणार आहे. या सर्व स्थळांची शास्त्रोक्त पद्धतीने माहिती देण्यासाठी प्रथमच या स्थळांवर गाइड नियुक्त केले जाणार आहेत.
सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वसईला विपुल निसर्गसंपदा लाभली आहे. त्यामुळे पर्यटकांचा सतत वसईकडे ओढा असतो. वसई हे पुरातन आणि ऐतिहासिक शहर नेहमीच अभ्यासू आणि पर्यटकांना आकर्षण राहिले आहे. जुने चर्च, मंदिरे, किल्ले, बौद्ध स्तूप, तीर्थक्षेत्र, निर्मळ व नयनरम्य समुद्र किनारे आदींनी वसईचा परिसर बहरलेला आहे. ते बघण्यासाठी विविध भागांतून पर्यटक येथे येत असतात. या सर्वाना वसईचे वैभव व्यवस्थित अभ्यासता यावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी पर्यटन बस सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र त्याबाबत अद्याप काही निर्णय घेतला गेला नसल्याचे परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी सांगितले.

वसईत पर्यटन बसचा हा प्रयोग होत असून तो विचाराधीन आहे. त्याचा मोठा फायदा पर्यटकांना होणार आहे.
– अजीव पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती.

बसची रचना कशी?
* या बसची रचना आरामदायी असेल.
* मोठय़ा पारदर्शक काचा असलेली वातानुकूलित तसेच खुली बस असे तिचे स्वरूप असेल.
* बसमध्ये मोठा टीव्ही स्क्रीन असेल. ज्या मार्गावरून ही बस जाईल, त्या मार्गावरील ठिकाणे, स्थळे यांची माहिती स्क्रीनवरील चित्रफितीवरून दाखवली जाईल.

प्रेक्षणीय स्थळांचा अभ्यास
एरवी वसईला कुणी आले तर नेमके जायचे कुठे, आणि काय काय पाहायचे असा प्रश्न पडलेला असतो. हा गोंधळ असल्याने वसई बाहेरून आलेल्यांना नि वसई बघता येत नाही. अनेकदा रिक्षाचालकांकडून फसगत होत असते. पर्यटनबसचा मार्ग वसईतल्या प्रमुखे प्रेक्षणीय स्थळांचा अभ्यास करून तयार केला जाणार आहे. एका दिवसात किती स्थळे बघता येतील, त्यांचे अंतर काय या सर्वाचा अभ्यास केला जाणार आहे. पर्यटन बसचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मग धार्मिक किंवा देवस्थान दर्शन देणाऱ्या बसचा प्रयोगही राबविला जाणार आहे.

वसईत प्रथमच ‘गाइड’चा प्रयोग
वसई, अर्नाळा येथील किल्ला, सोपाऱ्यातील बौद्ध स्तूप, परशुरामांची भूमी असलेले श्री क्षेत्र निर्मळ, जीवदानी देवस्थान आदी बघण्यासाठी लोक येत असतात. त्या भागात गेल्यावर त्या स्थळ आणि देवस्थानांबाबत माहिती मिळत नाही. यासाठी तेथे गाइड ठेवण्यात येणार आहे. पर्यटन बसमधून उतरलेल्या प्रवाशांना या गाइडद्वारे त्या त्या विभागाचा फेरफटका घडवून शास्त्रीय माहिती देण्यात येईल. वसईच्या ऐतिहासिक स्थळांवर आजवर गाइड नव्हते. या गाइडमुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि येणाऱ्या लोकांनाही त्या स्थळाची इत्थंभूत माहिती मिळू शकणार आहे. वसईतील खाद्यसंस्कृतीची माहितीही पर्यटकांना देण्यात येणार आहे.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?