25 February 2021

News Flash

पासपोर्ट प्रकरणांसाठी विशेष न्यायालये

गेल्या तीन वर्षांपासून काही कारणास्तव प्रलंबित राहिलेले सुमारे पाच हजारांहून अधिक अर्ज निकाली काढण्यासाठी ठाणे पासपोर्ट कार्यालयाने

| March 17, 2015 12:09 pm

गेल्या तीन वर्षांपासून काही कारणास्तव प्रलंबित राहिलेले सुमारे पाच हजारांहून अधिक अर्ज निकाली काढण्यासाठी ठाणे पासपोर्ट कार्यालयाने ‘पासपोर्ट अदालत’ भरविण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये संबंधित अर्जदारांच्या अर्जातील त्रुटी सोडविण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. यामुळे या अर्जदारांचा पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ठाणे पासपोर्ट कार्यालयात गेल्या वर्षी दोन लाख ३८ हजार ५४२ अर्ज दाखल झाले. त्यापैकी दोन लाख २८ हजार ५३९ अर्जदारांना पासपोर्ट वितरीत करण्यात आला. काही अर्जदारांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याने त्यांना अद्याप पासपोर्ट मिळू शकलेला नाही. गेल्या तीन वर्षांत अशा अर्जदारांचा आकडा पाच हजाराहून अधिक झाला आहे. अर्जातील त्रुटी सोडविण्यासाठी आणि उर्वरित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठाणे कार्यालयाने संबंधित अर्जदारांना नोटीसा पाठविल्या आहेत. मात्र, या अर्जदारांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे हे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी ‘पासपोर्ट अदालत’ भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे पासपोर्टचे अधिकारी टी. डी. शर्मा यांनी दिली. बुधवारी, १८ मार्चला सकाळी १० ते ३ यावेळेत वागळे इस्टेट येथील पासपोर्टच्या जुन्या कार्यालयात ‘पासपोर्ट अदालत’ घेण्यात येणार असून अशी अदालत पहिल्यांदाच भरविण्यात येणार आहे. या अदालतीमध्ये संबंधित अर्जदारांच्या अर्जातील त्रुटी सोडविण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याने संबंधित अर्जदारांना पासपोर्ट मिळू मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

पासपोर्ट वितरणाच्या वेळेत बचत
ठाणे पासपोर्ट कार्यालयामध्ये ऑनलाइनद्वारे दिवसाला १२०० अर्ज दाखल होतात आणि त्यानुसार संबंधित अर्जदाराला सुमारे एक किंवा दीड महिन्याच्या कालावधीने पासपोर्टच्या मुलाखतीसाठी वेळ दिला जातो. दाखल होणारे अर्ज आणि मुलाखत यामधील वेळ कमी व्हावा आणि अर्जदारांना पासपोर्ट लवकर मिळावा यासाठी ‘पासपोर्ट मेळावा’ घेण्यात येणार आहेत. ठाणे कार्यालयामध्ये महिन्यातून दोनदा तर नाशिक कार्यालयात महिन्यातून एकदा हा मेळावा होणार आहे. याचप्रमाणे वर्षभरात पाच ‘पासपोर्ट कॅम्प ’ होणार आहेत. अलीबाग, नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर या पाच जिल्ह्य़ांमध्ये हे कॅम्प होणार असून या जिल्ह्य़ांमध्ये जाऊन तिथेच नागरिकांना पासपोर्ट वितरीत केले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:09 pm

Web Title: special courts for passport cases
Next Stories
1 २७ गावांचा प्रश्न अधांतरी?
2 गावसमावेशाला काँग्रेसचा तीव्र विरोध
3 टी. चंद्रशेखर यांचे भाकित अखेर खरे
Just Now!
X