ठाणे : परदेशात जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि टोकियो ऑलिम्पिकमधील सहभागी खेळाडूंचे पूर्व नोंदणीविना लसीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार माजिवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रामध्ये लसीकरणाचे विशेष सत्र सुरू करण्यात आले आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी वर्ग तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू यांना लसीकरणाशिवाय परदेशात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे या सर्वांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. त्यासाठी माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात पूर्व नोंदणीविना सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच कोविन अ‍ॅपवर सर्व कागदपत्रांच्या नोंदी करूनच लस देण्यात येणार आहे. यामध्ये कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात येत असून पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर आणि ८४ दिवसांपूर्वी घेतला जाऊ  शकतो, असे पालिकेने म्हटले आहे.