बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. गणेशोत्सवाचे औचित्य साधून सलग सातव्या वर्षी मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते दर्शन निमकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे मंडळ आयोजन करीत आहे. सुयोग मंगल कार्यालयात ही स्पर्धा झाली. रॅपिड पद्धतीने घेण्यात आलेली ही स्पर्धा ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आली असून चार गटांत झालेल्या या स्पर्धेत ११० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १५ स्पर्धक हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त झालेले होते. यात ऋग्वेद आमडेकर (५) याचा सर्वात लहान खेळाडू म्हणून, तसेच सरदार (७०) यांना सर्वात ज्येष्ठ खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
८ वर्षांखालील मुले
प्रथम – अक्षित झा
द्वितीय – कणाद जोशी
मुली – रश्मी श्रीखंडे
’ १० वर्षांखालील मुले
प्रथम – योहान बोरिचा
द्वितीय – वीर लोहिया
मुली – खमुशी चुडकी
’ १२ वर्षांखालील मुले
प्रथम – आदित्य भिडे
द्वितीय – यश भाटिया
मुली – आकांक्षा निकम
’ १४ वर्षांखालील मुले
प्रथम – सागर नागदा
द्वितीय – हर्षल सोमण व अखिल सदाशिवम
मुली – पूर्वा कुलकर्णी
खुला गट प्रथम-राकेश कुलकर्णी
द्वितीय – अक्षय नेहेते
तृतीय – रामकृष्ण कशेळकर
कांचन सकुंडेला रौप्यपदक

पुणे बालेवाडी येथे १ ते ९ ऑगस्ट या कालावधीत वाको एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या कांचन सकुंडे हिने रौप्यपदक पटकाविले. पॉइंट फाइट या खेळाअंतर्गत ७० किलोपेक्षा जास्त वजनाच्या वर्गात कांचनचा नेपाळ आणि इराण देशांच्या स्पर्धकांसोबत सामना होता.
या स्पध्रेत जवळपास ४५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यात ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत कांचन सकुंडे हिने रौप्यपदक पटकाविले. प्रवीण चव्हाण यांनी या स्पर्धेसाठी कांचनला प्रशिक्षण दिले. कोलकात्याला होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील वाको किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी कांचनची निवड करण्यात आली आहे.

वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत राकेशकुमार प्रथम
Running
बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजित वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत शिवभक्त क्रीडा मंडळाच्या राकेशकुमार यादवने पहिला क्रमांक पटकावला. तर महिलांच्या खुल्या गटातही शिवभक्त क्रीडा मंडळाच्याच प्रियंका भोपीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत मोठय़ा उत्साहात वर्षां मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. धावपटू, शालेय विद्यार्थी, पुरुष व महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे ६००० स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल
’ पुरुष खुला गट
प्रथम – राकेशकुमार यादव
द्वितीय – सतीश रक्ते
तृतीय – सागर म्हसकर
’ महिला खुला गट
प्रथम – प्रियंका भोपी
द्वितीय -आकृती देशमुख
तृतीय – प्रमिला यादव
’ ज्येष्ठ नागरिकांचा गट
प्रथम – सूर्यकांत भोसले
द्वितीय – अवधूत पुराणिक
तृतीय – चंद्रकांत भोसले
राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्समध्ये ठाणेकरांची सुवर्ण कामगिरी

पुण्यातील सणस मैदान येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या रोझलिन लुईस हिने १८ वर्षांखालील मुलींच्या गटात १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक मिळवले असून सतीश नारायण याने धावण्यात व मिडले रिले स्पर्धेत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. पुण्यात पार पडलेल्या या स्पर्धेत ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने सहभागी झालेल्या ठाणे जिल्ह्य़ाच्या १८ वर्षांखालील मुलांनी व मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
मुलींमध्ये श्रुती जाधव हिने ४०० मीटर धावण्यात कांस्यपदक तर, निधी सिंग हिनेही ४०० मीटरच्या अडथळा शर्यतीत सुवर्ण तर ४०० मीटर धावण्यात रौप्य असे दुहेरी पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे. तर, मोनिका जोशी हिने १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्य तर, मिडले रिले स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. १८ वर्षांखालील मुलांमध्ये सतीश नारायण याने चांगली कामगिरी करीत ८०० मीटर अंतर १.५७ मिनिटात धावत सुवर्णपदक मिळवले तर रिले स्पर्धेत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याच्यासोबत गुरुनाथ माशेलकर, किरण भोसले आदींनीही चांगली कामगिरी केली आहे. यातील किरण भोसले यांने लांब उडी प्रकारात ७.२१ मीटर एवढी लांब उडी मारत विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक मिळवले आहे. श्रेयस मगर याने गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर यांनी दिली.