29 May 2020

News Flash

राज्यस्तरीय कुमार चॉपबॉल स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय कुमार चॉपबॉल स्पर्धेचे आयोजन १२, १३ व १४ जूनदरम्यान नवी मुंबई मनपा शाळा, सेक्टर १३, ऐरोली येथे केले आहे..

| June 10, 2015 12:28 pm

राज्यस्तरीय कुमार चॉपबॉल स्पर्धेचे आयोजन १२, १३ व १४ जूनदरम्यान नवी मुंबई मनपा शाळा, सेक्टर १३, ऐरोली येथे केले आहे. अठरा वर्षांखालील मुलांसाठी होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातून १६ संघ सहभागी होणार असून ठाणे जिल्हय़ाचे अठरा वर्षांखालील मुले व मुली असे दोन संघ सहभागी होणार आहेत. १२ जूनला सामने सुरू होणार असून १४ जूनला मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम सामने खेळवण्यात येणार आहेत, अशी माहिती सुरेश गांधी यांनी दिली.

चॉपबॉल म्हणजे काय?
नेटबॉल खेळासाठी वापरण्यात येणारा बॉल या खेळासाठी वापरण्यात येत असून खेळ खेळताना बॉल हातात आला की, तो आपल्या संघातील खेळाडूकडे फेकणे अपेक्षित असते. हा बॉल एक तर जागेवरूनच किंवा दोन पाऊल पुढे जाऊन फेकावा लागतो. जास्त पुढे गेल्यास बाद ठरविण्यात येते. हा बॉल गोल पोस्टवर टाकण्याऐवजी एका जाळीवर आपटायचा असतो. जाळीवर आपटला असता चॉप असा आवाज येतो, म्हणून या खेळाला चॉपबॉल असे म्हणतात.

सायक्लोथॉन स्पर्धेत अंबरनाथकरांची बाजी
प्रतिनिधी, बदलापूर
‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेत मुलांच्या ५ किलोमीटरच्या गटात सिद्धेश शिर्के याने, तर मुलींच्या ३ किलोमीटरच्या गटात गीतांजली खामकर (दोघेही अंबरनाथचे) यांनी बाजी मारली. पूर्वेकडील कात्रप येथील तालुका क्रीडा संकुलापासून या स्पर्धेला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेत ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथसह बदलापुरातील २००हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. दोन्ही गटांतील पहिल्या पाच विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, तसेच विजेत्याला सायकल बक्षीस म्हणून देण्यात आली. पर्यावरणाच्या संरक्षणार्थ शाळकरी मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि प्रदूषण टाळण्याबरोबरच आरोग्य उत्तम राहण्यासाठी सायकल चालवणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. या जनजागृतीसाठी गेली ५ वर्षे सलग या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे ठाणे जिल्हा सायकल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी सांगितले.
विजेते :
(मुले: ५ किलोमीटर)- सिद्धेश शिर्के, रोहन साखरे, रोहित मोरे, आयुश पडूरे, अजय मीना (मुली: ३ किलोमीटर)- गीतांजली खामकर, शकुंतला चौधरी, मनाली कदम, मधुरा गवळी, श्वेता दुखंडे.

ठाण्याच्या राज अकादमीचा श्रीलंकेत डंका
क्रीडा प्रतिनिधी, ठाणे
श्रीलंकेत पार पडलेल्या १३ वर्षांखालील निमंत्रित ट्वेंटी-२० क्रिकेट स्पध्रेत ठाण्याच्या राज क्रिकेट अकादमीने उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. अंतिम लढतीत त्यांना स्थानिक ब्लूम फिल्ड क्रिकेट अकादमीकडून ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. मालिकावीराचा मान राज अकादमीच्या राज शेट्टी याने पटकावला, तर राज अकादमीच्याच गितेश भागवत याला सवरेत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. १० संघांचा सहभाग असलेल्या या स्पध्रेच्या अंतिम फेरीत ब्लूम फिल्ड अकादमीने निर्धारित २० षटकांत ८ बाद १०२ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राज अकादमीचे धाबे दणाणले.

श्रृती अमृतेची दक्षिण
आशियाई स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी, बदलापूर
बदलापूरच्या श्रृती अमृतेच्या यशाची परंपरा कायम चालू असून मानांकित अशा दक्षिण आशियाई खेळांसाठी १८ वर्षांखालील मुलींच्या भारतीय संघाची कप्तान म्हणून तिची निवड करण्यात आली आहे. श्रृतीसोबत संघात इतर राज्यांतील अन्य दोन खेळाडू असणार आहेत. या दक्षिण आशियाई खेळांमध्ये सहा देश सहभागी होणार असून १७ ते १९ जूनदरम्यान या स्पर्धा दिल्ली येथे संपन्न होणार आहेत. बदलापूर टेबल टेनिस अकादमीचे खेळाडू असलेली श्रृती अमृते सध्या कुमार गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळ करणारी भारतीय खेळाडू असून सध्या भारताची अग्रमानांकित खेळाडूदेखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2015 12:28 pm

Web Title: sports news in thane district
टॅग Sports
Next Stories
1 तवांग संस्कृतीशी मिलाफ साधणारी ठाणेकराची कला
2 नागरिक-पोलीस यांच्यात समन्वय साधणारी ‘होप’
3 महाविद्यालयांना घुसखोरांचा ताप
Just Now!
X