News Flash

ठाणे, कल्याणात राज्य नाटय़ स्पर्धेची रंगत

राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची रंगत सध्या ठाणे आणि कल्याण शहरात पाहायला मिळत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेचे आयोजन केले

ठाण्यात २ डिसेंबर, तर कल्याणमध्ये ८ डिसेंबपर्यंत प्राथमिक फेरी
राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची रंगत सध्या ठाणे आणि कल्याण शहरात पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेचे आयोजन केले असून स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे ठाणे केंद्रावरील प्राथमिक फेरी तर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कल्याण केंद्राच्या प्राथमिक फेरीचा आनंद शहरवासीयांना घेता येणार आहे. ठाणे केंद्रावरील प्राथमिक फेरीची सुरुवात मंगळवारी ‘आला रे राजा’ या नाटकाने तर कल्याण केंद्रावरील प्राथमिक फेरीची सुरुवात ‘तू काय..मी काय’ या नाटकाने झाली. या स्पर्धेचा आनंद रसिकांना अवघ्या दहा, पंधरा रुपयांत घेता येणार आहे.

181115_LS_TVT_005

01

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 2:03 am

Web Title: state drama competition in thane
Next Stories
1 प्रवासी सुरक्षितता वाऱ्यावर
2 दीवाना हुआ बादल..
3 अस्सल भारतीय राखणदार!
Just Now!
X