महिनाभरात जोडणी पूर्ण होण्याची शक्यता

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी महत्त्वाचा असलेला मुंब्रा खाडीपुलाची लोखंडी तुळई (गर्डर) अखेर राजस्थानहून पुलाच्या ठिकाणी दाखल झाली आहे. ७६ मीटर लांब आणि ३५० टन वजनाच्या या गर्डरची सध्या जोडणी सुरू

Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू
Temperature in Mumbai today and tomorrow at 37 degrees
मुंबईतील तापमानाचा पारा आज, उद्या ३७ अंशावर
Megablock on Central Railways
मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Potholes and large holes in pavement slabs before paverblocks are installed
पेव्हरब्लॉक बसवण्यापूर्वीच खड्डे, पदपथाच्या स्लॅबला मोठी छिद्रे; कोपरखैरणे सेक्टर १५-१६ मधील प्रकार

असून येत्या महिन्याभरात मुंब्रा बावळण मार्गावर विशेष मेगा ब्लॉक घेऊन हा गर्डर पुलाला जोडला जाणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान नऊ किलोमीटर अंतराच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सुरूच आहे. ही पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते कर्जत आणि ठाणे ते कसारा मार्गावर लोकलच्या फे ऱ्या वाढवणे शक्य होणार असून या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. असे असले तरी विविध कारणांमुळे हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या नियोजनात बदल करून मुंब्रा येथील खाडीजवळून पाचव्या-सहव्या मार्गिकेसाठी खाडीपूल उभारण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले होते. खाडीकिनारी भागावरून जाणाऱ्या या पुलाचा काही भाग मुंब्रा बावळण मार्गावरून जातो. त्यामुळे या ठिकाणी गर्डर टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. सध्या या पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून केवळ गर्डर टाकून रेल्वे रूळ पसरवण्याचे काम शिल्लक आहे.

या पुलासाठी लागणारा ७६ मीटर लांबीचा आणि ३५० टन वजनाचा गर्डर राजस्थानहून मुंब्रा खाडीकिनारी दाखल झाला आहे.

नियोजन सुरू

सध्या पुलाच्या ठिकाणी या गर्डरची जोडणी वेगाने सुरू आहे. येत्या महिन्याभरात या जोडणीचे काम पूर्ण होणार असून तात्काळ मुंब्रा बावळण मार्गावर विशेष मेगा ब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वे, वाहतूक पोलीस, महापालिका यांच्यासोबत नियोजन सुरू असून सर्व परवानग्या पूर्ण झाल्यावरच गर्डर टाकला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे.