News Flash

आमदाराची बॅग पळविणाऱ्या रेल्वेतील चोरटय़ाला अटक

आमदारांची बॅग चोरीस गेल्याने दोन दिवसांपासून लोहमार्ग पोलीस, पोलिसांची विशेष पथके तपासाला लागली होती.

(संग्रहित छायाचित्र)

बुलढाणा येथील आमदार राहुल बोंद्रे यांची कल्याण रेल्वे स्थानकातून बॅग पळविणाऱ्या चोरटय़ाला कल्याण, भायखळा पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली. चोरटा हा कल्याणमधील दत्तमंदिर झोपडपट्टी येथील रहिवासी आहे.

आमदारांची बॅग चोरीस गेल्याने दोन दिवसांपासून लोहमार्ग पोलीस, पोलिसांची विशेष पथके तपासाला लागली होती. बोंद्रे यांच्या पिशवीत ५१ हजार रुपये रोख, पॅनकार्ड, मोबाइल व इतर दस्तऐवज होते. कल्याण रेल्वे स्थानकात गाडी थांबताच ही बॅग चोरीला गेली. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चित्रण चित्रित झाले होते. चित्रणात आरोपीची माहिती पोलिसांनी जमा केली. तो कल्याण पूर्वेतील दत्तमंदिर झोपडपट्टीतील अहमद हबीबअली सय्यद असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्या घरी गेल्यावर तो नाशिक येथे गेल्याची माहिती मिळाली. तो तेथून कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 12:34 am

Web Title: stolen gangs caught in the bag of mlas abn 97
Next Stories
1 अतिधोकादायक इमारतींची झाडाझडती
2 रेल्वेडब्यांच्या नव्या ढंगामुळे प्रवाशांचा बेरंग
3 तपास चक्र : फ्रेंच दाढी
Just Now!
X