पूर्वकल्पना न देता निर्णय घेतल्याने मच्छीमार संतप्त

तेलाचे साठे शोधण्यासाठी ओएनजीसी कंपनीने वसई आणि परिसरातील समुद्रात सर्वेक्षण सुरू केल्याने मासेमारी दोन महिने बंद करण्यात आली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता ही बंदी घालण्यात आल्याने वसईतील मच्छीमार संतप्त झाले आहेत. या काळात मासेमारी बंद होणार असल्याने मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसणार असून खवय्यांचीही मोठी निराशा होणार आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

तेलाचे साठे शोधण्यासाठी ओएनजीसी कंपनीने १ जानेवारीपासून सेस्मिकच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. हे सर्वेक्षण २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तेलाचे उत्खनन करण्यासाठीचा हे सर्वेक्षण केले जात आहे. मात्र सुरू करण्यात आलेले सर्वेक्षण येथील मच्छीमारांना विश्वासात न घेता आणि कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न दिल्याने करण्यात येत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा आली आहे.

कंपनीने सर्वेक्षणासाठी समुद्रात विशिष्ट जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या भागात येथील मच्छीमारांना दोन महिने मच्छीमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०१९ दरम्यान हे सर्वेक्षण चालणार आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करता येणार नाही. ओएनजीसी कंपनीने वायू आणि तेलाचे साठे याचा शोध घेण्यासाठीही मोहीम राबवली आहे. या सर्वेक्षण करीत असताना समुद्रात स्फोटदेखील केले जाणार असल्याने जलचर प्राणी आणि मानवी जिवाला धोकाही निर्माण होऊ  शकतो, यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

आर्थिक फटका

यंदा पावसाळय़ात मच्छीमार वादळी वाऱ्यांमुळे संकटात सापडले होते. आता या बंदीमुळे त्यांना पुन्हा आर्थिक फटका बसला आहे. वसईतील नायगाव कोळीवाडा, अर्नाळा, पाचूबंदर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करतात. मासेमारी हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. होणारे नुकसान प्रशासन भरून देणार का, असा सवाल गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाला विचारला जात आहे.

तेल सर्वेक्षणासंदर्भातील कोणत्याही प्रकारची माहिती मच्छीमारांना देण्यात आली नाही. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होणार आहे. आता जे सर्वेक्षण सुरू केले आहे, ते प्रत्यक्षात मासेमारी केली जाते, त्या ठिकाणी केले जात असल्याने मच्छीमारांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.   – संजय कोळी, अध्यक्ष, वसई मच्छीमार संस्था