आपल्या देशात गोहत्या बंदी करण्यात आली असली तरी सर्व गायींची तपासणी केल्यास ९० टक्के गायींच्या पोटातून प्लास्टिक निघेल ही परिस्थिती आहे. त्यामुळे गोहत्या बंदीपेक्षा प्लास्टिकमुक्तीनेच गाईंचा अधिक सन्मान होईल, असे प्रतिपादन निसर्गप्रेमी शरद काळे यांनी केला.
निसर्गाचे ऋण फेडण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असल्यानेच आम्ही पुढाकार घेऊन निसर्गऋण हा उपक्रम राबवून कचरा निर्मूलनाचे कार्य करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. बदलापूर पालिका सभागृहात बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान सर्व नगरसेवकांना आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना निसर्गऋण या उपक्रमाबाबतची शरद काळे यांनी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.