News Flash

आजारी ‘ब्राऊन बूबी’ची पुन्हा भरारी!

वडराई येथील मच्छीमार गणेश मेहेर यांना २६ ऑगस्ट रोजी समुद्रकिनारी एक आगळावेगळा पक्षी आढळला.

आजारी ‘ब्राऊन बूबी’ची पुन्हा भरारी!
आजारी असलेल्या आणि भरकटलेल्या ब्राऊन बूबी पक्ष्याला पक्षीमित्र आणि पशुवैद्यांच्या मदतीने उपचार करण्यात आले.

नीरज राऊत

वडराई गावातील एका मच्छीमाराला समुद्रकिनारी ब्राऊन बूबी हा पक्षी सापडला. आजारी असलेल्या आणि भरकटलेल्या या पक्ष्याला पक्षीमित्र आणि पशुवैद्यांच्या मदतीने उपचार करण्यात आले. बरे झालेल्या या पक्ष्याने पुन्हा हवेत भरारी घेतली.

वडराई येथील मच्छीमार गणेश मेहेर यांना २६ ऑगस्ट रोजी समुद्रकिनारी एक आगळावेगळा पक्षी आढळला. भरकटलेल्या या पक्ष्याला त्यांनी घरी आणले आणि एका मोठय़ा टबमध्ये ठेवले.

या पक्षाविषयी पक्षीमित्र प्रा. भूषण भोईर यांना समजताच त्यांनी तातडीने मेहेर यांच्या घरी धाव घेतली. या पक्ष्याला त्यांनी टॉवेलमध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तो बेशुद्ध झाल्याने पशुवैद्यांना बोलावण्यात आले. अशक्तपणा आणि मंद वाऱ्याच्या प्रवाहामुळे हा पक्षी आजारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षीमित्रांनी एका बंद खोलीत त्याला मोकळे सोडले आणि खायला काही मासे ठेवले. ८ ते १० तासांच्या आरामानंतर या पक्ष्याला वडराईच्या समुद्रकिनारी सोडण्यात आले. ‘ब्राऊन बूबी’ने उंच भरारी घेतल्यानंतर पक्षीमित्रांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:02 am

Web Title: suddenly brown boobie again fills
Next Stories
1 नायगाव-बापाणे रस्त्यावरील खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त
2 शहरीकरणाशी पालघरचा घरोबा!
3 कुपोषण निर्मूलनासाठी आजपासून पोषण अभियान
Just Now!
X