कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी भेट नाकारल्याने शशीकुमार चेटियार यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयातील गच्चीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. चेटियार हे कल्याण येथील मंगेशी सिटी या इमारतीत राहतात. तेथील नर्सरीला सोसायटीने हरकत घेतल्याने आयुक्तांनी चेटियार यांच्या घराला सील ठोकले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 6:58 am
Web Title: suicide attempt at kdmc campus