03 December 2020

News Flash

ठाणे उड्डाणपुलावर लटकून आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान दाखवत वाचवला जीव

भगवान कांबळे यांनी भरदिवसा आत्महत्येचा प्रयत्न केला

ठाण्यातील कळवा येथे एका व्यक्तीने पुलावरुन दोरखंडाला लटकत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. भगवान कांबळे यांनी भरदिवसा आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मात्र पोलीस कॉन्स्टेबल जयवंत पवार यां नी प्रसंगावधान दाखवत त्यांचा जीव वाचवला. यानंतर त्यांचं कौतुक होत आहे. ठाण्यातील कळवा येथे एका व्यक्तीने पुलावरुन दोरखंडाला लटकत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. भगवान कांबळे यांनी भरदिवसा आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मात्र पोलीस कॉन्स्टेबल जयवंत पवार यां नी प्रसंगावधान दाखवत त्यांचा जीव वाचवला. यानंतर त्यांचं कौतुक होत आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारे भगवान कांबळे कौटुंबिक त्रासाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी नवीन कळवा पुलावरुन दोरखंडाला लटकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस कॉन्स्टेबल जयंत पवार यांनी बाजूला असलेल्या हायड्राच्या मदतीने त्यांना वाचवलं. दरम्यान झालेल्या प्रकारामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाइलवर रेकॉर्ड केला. दरम्यान, भगवान कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. पोलीस कॉन्स्टेबल जयवंत पवार यांनी प्रसंगावधान दाखवल्यानेच भगवान कांबळे यांचा जीव वाचला असून ठाणे पोलिस आयुक्तांनी पाच हजार रुपयांचे तात्काळ बक्षीस जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 12:57 pm

Web Title: suicide attempt in thane sgy 87
Next Stories
1 डोंबिवली: मुलांना शाळेत सोडायला जाताना अपघात, आई-वडील आणि मुलीचा मृत्यू
2 खोदकामामुळे ठाण्यात ‘धूळ’वड
3 प्राण्यांना हुसकावण्यासाठी क्रूर उपाय
Just Now!
X