सध्या उन्हाळय़ाच्या सुटीत मुले उन्हाळी शिबिरांचा आनंद घेत आहेत.  हाच आनंद गतिमंद मुलांनाही मिळावा यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन व जागृती पालक संस्था यांच्या वतीने ठाण्यात विशेष उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक गतिमंद मुले यात सहभागी झाली आणि त्यांनी विविध गोष्टींचा आनंद लुटला.
९ व १० मे दरम्यान या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर, छायाचित्रकार प्रवीण देशपांडे आदींनी शिबिरात मार्गदर्शन केले. ३० गतिमंद मुलांनी त्यात भाग घेतला. जागृती पालक संस्थेच्या अध्यक्षा सुश्री ईश्वरी, गुलराजानी, उपाध्यक्ष सतीश धरत आणि सचिव रहीम मुलाणी यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
फिजिओथेरपीचे वाटप
रोटरी क्लबच्या वतीने जागृती पालक संस्थेस फिजिओथेरपी उपकरणे प्रदान करण्यात आली. संस्थेच्या ममता डे केअर, सेंटर, जुने ज्ञानसाधना महाविद्यालय, मनोरुग्णालय रस्ता येथे हा कार्यक्रम झाला. जागृती पालक संस्था ही गेली १३ वर्षे गतिमंद मुलांसाठी काम करते. अशा मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही संस्था आहे. या मुलांना नियमित फिजिओथेरपीची आवश्यकता असते, मात्र सगळ्यांनाच तो खर्च परवडणारा नसतो. नेमकी ही समस्या हेरून रोटरी क्लबचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम हाती घेतला. या क्लबने जागृती पालक संस्थेला लागणारी बहुतेक उपकरणे तसेच संगणक उपलब्ध करून दिले. रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल अजय गुप्ता, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन