चैत्राचे आगमन म्हणजे गुढीपाडवा. चैत्रचाहूल लागली की रानापानांत नवा बहर येतो. मनात जल्लोष उसळू लागतो. शनिवारी नववर्षांच्या स्वागताला उत्साह, आनंद, नृत्य, संगीताला मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूरमध्ये उधाण येणार आहे. दीपोत्सवासोबतच स्वागतयात्रेत ढोलाताशांच्या गजरात पालखी मिरवणुका निघणार आहेत. या पाचही शहरांमध्ये ढोलांनी सारा आसंमत दणाणून निघणार आहे. डोंबिवलीतील स्वागतयात्रेत खुद्द मुख्यमंत्री सहभागी होत आहेत. तर इतर ठिकाणी मान्यवर, कलावंत सामील होऊन उमेदीने नववर्षांचे स्वागत करणार आहेत. त्याविषयी..

स्वागत यात्रेचा मार्ग
कौपिनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान, रंगोबापूजी गुप्ते चौक, समर्थ मंदिर, सेंट जॉन शाळा मार्ग, दगडी शाळेजवळ (चित्ररथांचा शिस्तीत पालखी बरोबर सहभाग) श्रीगजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरी निवास सर्कल, नौपाडा पोलीस ठाणे, संत नामदेव महाराज चौक, नौपाडा टेलिफोन एक्स्चेंज, गोखले मार्ग, समर्थ भांडार येथून राम मारुती रोड, संत राम मारुती चौक तेथून आमंत्रण हॉटेल, तलावपाळीवरून साईप्रसाद हॉटेल, डॉ. पंडित हॉस्पिटल नौका विहार कोपऱ्यात वळून रंगोबापूजी गुप्ते चौकामध्ये (रथयात्रेची सांगता), पालखी आणि पादचारी मराठी ग्रंथसंग्रहालय, मामलेदार कचेरी मार्गे कौपिनेश्वर मंदिर. मंदिरातील महाआरती आणि प्रसाद वाटपानंतर समारोप.

ठाणे
मुख्य स्वागतयात्रा
* आयोजक : श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे
* प्रारंभ ठिकाण : कौपिनेश्वर मंदिर, वेळ : सकाळी ६.४५
स्वागतयात्रेची वैशिष्टय़े :
* स्वागत यात्रेमध्ये ४५ हून आधिक चित्ररथांचा सहभाग
* शहरातील १४ वर्षे जुनी भव्य स्वागत यात्रा
* भ्रष्टाचार निर्मूलन, महिला सबलीकरण, स्वच्छता अभियान, महिला स्व-संरक्षण, संत माहात्म्य, गीत माहात्म्य, योग प्रशिक्षण, जिमनॅस्टिक प्रात्यक्षिक, साईबाबांची पालखी, खंडोबाचे दर्शन.
* प्रमुख पाहुणे : ठाण्याचे महापौर संजय मोरे, आमदार संजय केळकर
रांगोळ्यांच्या पायघडय़ा :
* संस्कार भारती संस्था भगवती शाळेजवळील मैदानामध्ये भव्य रांगोळी साकारणार आहे.
* गावदेवी मैदानात रंगवल्ली संस्थेची सोळाशे चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात येणार आहे.
स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम
* मासुंदा तलावातील मंदिरात महापौरांच्या हस्ते दीपप्रज्वलन
* मासुंदा तलावाच्या सभोवताली हजारो दीपांचे प्रज्वलन करून दीपोत्सवाचे सादरीकरण

ठाण्यातील उपस्वागतयात्रा
सावरकरनगर गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रा
* आयोजक :  श्री कौपिनेश्वर न्यास उपसमिती
* वेळ : सकाळी ८ ’ठिकाण : साठेनगर सुपर्णेश्वर मंदिर
* वैशिष्टय़े : स्वागत यात्रेत राजस्थानी, मातंग आणि वाल्मीकी समाजाचा सहभाग दोन लेझिम पथकांचाही समावेश. पूर्वसंध्येला परिसरातील १२ मंदिरांत रांगोळ्या आणि दीपोत्सवाचे आयोजन
* स्वागत यात्रेचा मार्ग : साठेनगर सुपर्णेश्वर मंदिर, इंदिरानगर नाका, जयभवानी मेडिकल स्टोर्स, सावरकरनगर शाळा, मातोश्री बिल्डिंग, ज्ञानोदय विद्यामंदिर, रवेची माता मंदिर, सावरकरनगर (जुना परिसर), म्हाडा वसाहत, ठाकूर महाविद्यालय, आई माता मंदिर.

खारेगाव नववर्ष स्वागत यात्रा
* आयोजक : श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, अंतर्गत खारीगांव पारसिक नगर परिसर नववर्ष स्वागत यात्रा समिती
* वेळ : पूर्वसंध्येला सायंकाळी ४ वाजता ’ठिकाण : अरण्येश्वर मंदिर
* वैशिष्टय़े : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला निघणारी स्वागत यात्रा, हजारो पणत्यांनी खारीगांव तलाव उजळणार , पारंपरिक वेषात साजशृंगार करून खारीगांव तळ्यावर दीपोत्सव, आकाशदिव्यांची रोषणाई, मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
* स्वागत यात्रेचा मार्ग : अरण्येश्वर मंदिर येथून शोभायात्रेला सुरवात, तेथून ग्रामदेवता व इतर देवांच्या देवळांमध्ये रोषणाई व आरती.  

ब्रह्मांड-आझादनगर परिसर स्वागत यात्रा
* आयोजक : श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे, अंतर्गत ब्रह्मांड-आझादनगर नववर्ष स्वागत यात्रा समिती
* वेळ : सकाळी ७.३० वाजता ’ठिकाण :  आझादनगर साईमंदिर
* वैशिष्टय़े : १२ वर्षांपासून ९ सामाजिक संस्थांच्या सहभागाने निघणारी स्वागतयात्रा, ब्रह्मांड सोसायटीतील मंडळींचा सहभाग, शाळकरी मुलांचे लेझिम पथक, तरुणांची मोटारसायकल रॅली
* स्वागत यात्रेचा मार्ग : आझादनगर साई मंदिर येथून ब्रह्मांड परिसरातील मुख्य मार्ग, ब्रह्मांड फेज-८ मध्ये समारोप
* स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम : भव्य रांगोळी आणि दीपोत्सव, आवाजविरहित फटाक्यांची आतषबाजी

माजिवडा सेवाभावी
ज्येष्ठ नागरिक संस्था
* आयोजक : माजिवडा सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संस्था
* वेळ : सकाळी ६.४५
* ठिकाण : श्रीचांगाईमाता मंदिर
* वैशिष्टय़े : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेली स्वागत यात्रा, पहिल्याच वर्षी सुंदर माजिवडा या संकल्पनेवर आधारित स्वागत यात्रा
* स्वागत यात्रेचा मार्ग:  श्रीचांगाईमाता मंदिर येथून माजिवडा गाव परिसरामध्ये फिरून सांगता

डोंबिवली
tv08* मुख्य आयोजक : श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली
* प्रारंभ ठिकाण : गणेश मंदिर मंदिर, वेळ : सकाळी ६.१५
* स्वागत यात्रेचा मार्ग : श्री गणेश मंदिरात सकाळी ५ वाजता महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाची महापूजा, विद्याधर शास्त्री यांच्या हस्ते पंचांग पूजन, विशेष अतिथी अनुराधा प्रभुदेसाई यांच्या हस्ते पालखीपूजन, गुढीपूजन झाल्यावर सकाळी ६.१५ ला पालखी मंदिरातून यात्रेसाठी निघेल. सकाळी ६.३० ला डोंबिवली पश्चिमेतील कान्होजी जेधे मैदान येथून सुरुवात. सुभाष रोड, सम्राट हॉटेल, पं. दीनदयाळ मार्ग, रेल्वे पूलमार्गे पूर्वेस आई बंगला (रघुकुल), शिवमंदिर रोड, राजेंद्रप्रसाद रोड, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, फडके रोड मार्गे, अप्पा दातार चौकात स्वागत यात्रेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने होईल.
स्वागत यात्रेची वैशिष्टे :-
* स्वागत यात्रेमध्ये ६० हून अधिक चित्ररथांचा सहभाग
* शहरातील १७ वर्षे जुनी भव्य स्वागत यात्रा
* सुंदर डोंबिवली, महिला सक्षमीकरण, विविधतेतून एकता आदी विषयांवरील चित्ररथ
* प्रमुख अतिथी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई, दाते पंचांगाचे मोहनराव दाते, महापौर कल्याणी पाटील
* रांगोळ्यांच्या पायघडय़ा :- आनंदवनमधील कलाकार श्री गणेश मंदिर परिसरात साकारणार धान्याची भव्य महारांगोळी. संस्कार भारती संस्थेच्या वतीने यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी साकारणार आहेत. भगवती शाळेजवळील मैदानामध्ये भव्य रांगोळी साकारणार आहे.
स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम :
* भागशाळा मैदान येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन                       – भागशाळा मैदान येथे महिला संरक्षण प्रात्यक्षिके, भारतीय मैदानी खेळ, दंडयुद्ध प्रात्यक्षिके
* भागशाळा मैदान येथे शतकमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या दाते पंचांगाचे मनोहर दाते व लक्ष्य फाऊंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांचा सत्कार
* पूर्वेतील पाटकर मैदान, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी
मारुती मंदिर, गोग्रासवाडी, आनंदनगर येथे; तर पश्चिमेतील भागशाळा मैदान येथे नयनरम्य आवाजविरहित फटाक्यांची आतषबाजी

कल्याण
 tv06 tv07हिंदू नववर्ष स्वागत यात्रा (कल्याण पश्चिम)
* आयोजक : कल्याण संस्कृती मंच
* ठिकाण : सिंडिकेट, कल्याण (प.),
* वेळ : सकाळी ६.३० वाजता
* वैशिष्टय़े : स्वागत यात्रेतील २२ ढोलपथकांचा सहभाग व गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवार सायंकाळी ५ ते रात्री        १० या वेळेत कल्याण पश्चिम येथील साई चौक येथे कलामहोत्सवाचे आयोजन.
* स्वागत यात्रेचा मार्ग- सिंडिकेट, आयुक्त बंगला, संतोषी माता रस्ता, सहजानंद चौक, शिवाजी चौक, शंकरराव चौक, अहल्याबाई चौक, टिळक चौक, पारनाका, शारदा मंदिर.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा (कल्याण ग्रामीण)
* आयोजक : पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व आनंद वारकरी संप्रदाय पंथ
* ठिकाण : स्टार कॉलनी गणेश मंदिर, डोंबिवली, कल्याण शीळ रोड दावडी गणेश मंदिर ’वेळ : सकाळी ६.३० वाजता
* स्वागत यात्रेची वैशिष्टय़े : स्वागत यात्रेत सहभागी पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, बैलगाडय़ा, वारकरी संप्रदाय, लेझिम, झांज पथक, चित्ररथ, वारकरी भूषण ह.भ.प. शंकर महाराज शिंदे यांचे प्रवचन व महाप्रसादाने सांगता
* स्वागत यात्रेचा मार्ग : स्टार कॉलनी, गणेश नगर गणपती मंदिर डोंबिवली पूर्व येथून सुरुवात, मानपाडा मार्गे, सागांव सागर्ली भागातून पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे मार्गस्थ तर दावडी गावातील गणेश मंदिरमधील पालखी कल्याण शीळ मार्गे पिंपळेश्वर मंदिर येथे समाप्ती.

बदलापूर
मुख्य स्वागत यात्रा
tv09* आयोजक : श्री हनुमान मारुती देवस्थान व नववर्ष स्वागत यात्रा समिती
* प्रारंभ ठिकाण : दत्त चौक, बदलापूर(प.) ’वेळ : सकाळी ६.३०
* स्वागत यात्रेचा मार्ग : बदलापूर पश्चिमेकडील दत्त चौक येथील दत्तमंदिराहून यात्रेला प्रारंभ होईल. येथून गणेश चौक येथील गणेश मंदिर व तेथून मांजर्ली गावातून मोहनानंदनगर येथे यात्रा पोहोचेल. पुढे सवरेदयनगर मार्गे यात्रा पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठेत येऊन पुढे उड्डाण पुलामार्गे स्टेशन पूर्व भागात यात्रेचे आगमन होईल. स्टेशनजवळून यात्रा कुळगाव सोसायटी येथून शिवाजी चौक मार्गे गोळेवाडी व येथून गांधी चौकात जाहीर सभेने यात्रेचा समारोप होईल.
* स्वागत यात्रेची वैशिष्टय़े :     यंदा खास स्वागत यात्रेसाठी तयार करण्यात आलेले पन्नास जणांचे गर्जा ढोलपथक हा आकर्षणाचा विषय असेल,  शहरातील १३ वर्षे जुनी भव्य स्वागत यात्रा, महिलांचे पथक, लेझिम पथक, गुढी पथक व ध्वज पथक, वारकरी पथक आदींचा यंदा समावेश असणार, भव्य व दिमाखदार चित्ररथांचा समावेश असणार, मान्यवरांच्या हस्ते ‘सामाजिक सेवा पुरस्काराचे’ व घेण्यात आलेल्या स्पर्धाचे वितरण करणार.

* रांगोळ्यांच्या पायघडय़ा : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बदलापूर पूर्वेकडील मारुती मंदिरात २० फुटी अखंड भारत या विषयावर रांगोळी काढण्यात येणार आहे.
* स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम : यंदा बदलापूरमध्ये नववर्ष स्वागत यात्रेच्या स्वागताप्रीत्यर्थ १५ मार्चपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यात आतापर्यंत स्वरानंदचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, महिला मंडळाचे कार्यक्रम व मेहंदी स्पर्धा भजन सेवा, पांडुरंग बालकवडे यांचे संभाजी महाराज ते ताराराणी या विषयावरील व्याख्यान आदी कार्यक्रम झाले आहेत, शुक्रवारी सायंकाळी ७ ते ९.३० या वेळेत ह.भ.प. श्रेयसबुवा बडवे व मानसी बडवे यांची कीर्तन जुगलबंदी होणार असून सायंकाळी ७.३० वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे., रात्री ९.३० नंतर विशेष आकर्षण असलेल्या गर्जा ढोलपथकाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून त्यानंतर आतषबाजी करण्यात येणार आहे.

बदलापुरातील उप-स्वागतयात्रा
* बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा येथील श्री साई शाम मंदिर.
* बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज रोड येथील स्वामी समर्थ मंदिर
* बदलापूर पूर्वेकडील अष्टगंध अध्यात्म व्यासपीठातर्फे चित्ररथासह स्वागत यात्रा निघणार आहे.
* बदलापूर पूर्वेकडील शिरगांव येथून निघणाऱ्या उपयात्रेत तलवार पथक, लेझिम पथक, महिलांचे पथक व भजनी मंडळे तसेच लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीच्या संकल्पना मांडण्यात येणार आहे.
* बदलापूर पूर्वेकडील कुळगाव येथील शिवमंदिर व गांवदेवी मंदिरातर्फे उपयात्रा काढण्यात येणार आहे.
* रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरियाच्या बदलापूर शाखेतर्फे रक्त संकलनासाठीच्या वातानुकूलित कक्षाचे व त्यांच्या सामाजिक उपक्रमांची माहिती व संदेश देणारे फलक घेऊन त्यांचे सदस्य यात्रेत सहभागी होणार आहे.

अंबरनाथ
मुख्य स्वागत यात्रा
tv10* भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती, अंबरनाथ
* प्रारंभ ठिकाण : स्वामी समर्थ चौक, अंबरनाथ (पू.)
* वेळ : सकाळी ७.३०
* स्वागत यात्रेचा मार्ग : अंबरनाथ पूर्वेकडील स्वामी समर्थ चौकातून यात्रेला प्रारंभ होऊन यात्रा हेरंब मंदिर येथे पोहोचेल. येथून शिवाजी चौक मार्गे यात्रा हुतात्मा चौकात चौकात पोहोचून यात्रेचा समारोप होईल.
* स्वागत यात्रेची वैशिष्टय़े :     यंदा स्वागत यात्रेच्या माध्यमातून ‘स्वच्छ अंबरनाथ, सुंदर अंबरनाथ’चा नारा देणार व याचाच भाग म्हणून तुळशीचे रोप देऊन उपस्थितांचा व मान्यवरांचा गौरव करणार, चाळीस वर्षे जुन्या सुयोग महिला मंडळाचा ‘जय मल्हार’ मालिकेतील पात्रांच्या व्यक्तिरेखा साकारत या मालिकेतील प्रसंग चौकाचौकांत साकारणार, अंबरनाथमधील मोरया व शिवप्रतिष्ठा या ढोलपथकांचा होणार गजर, दहा प्रमुख महिला मंडळे व पंधरा महिला भजनी मंडळांच्या माध्यमातून महिला आघाडीवर राहणार. तसेच महिलांचे लेझिम पथक खेळ सादर करणार, उपयात्रांचे चित्ररथ व देखावे हे प्रमुख आकर्षणाचे विषय, छत्रपती कला मंच मांडणार
* प्रमुख पाहुणे :  आमदार बालाजी किणीकर व नगराध्यक्ष सुनील चौधरी.
* रांगोळ्यांच्या पायघडय़ा :    – हेरंब मंदिर, स्वामी समर्थ चौक व हुतात्मा चौक आदी प्रमुख चौकात संस्कार भारतीच्या रांगोळ्या.    
* पूर्वसंध्येचा कार्यक्रम : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौकात हेरंब रहिवासी संघ दीपोत्सव करणार आहे.

अंबरनाथमधील उप-स्वागतयात्रा
* अंबरनाथ शहरातील सर्व मंदिरे व शिवमंदिर उपयात्रा प्रारंभ सकाळी ७.३० वाजता.
* दुचाकींमार्फत सकाळी ८.०० वाजता अंबरनाथची नगर प्रदक्षिणा होणार.
* अंबरनाथ पूर्व विभागातील सर्व उपयात्रांचे आगमन हेरंब मंदिर व दत्त मंदिर, वडवली येथे सकाळी ८.३० वाजता होणार.
* अंबरनाथ पश्चिम विभागातील सर्व उपयात्रांचे आगमन महात्मा गांधी विद्यालय येथे सकाळी ८.३० वाजता होणार.
* एकत्र जमलेल्या सर्व यात्रा पूर्व विभागातील शिवाजी चौकात सकाळी ९.०० वाजता होणार.
* अंबरनाथ पूर्व व पश्चिम विभागातील यात्रा पूर्वेकडील गजानन महाराज मंदिर येथून सकाळी ९.३० वाजता प्रस्थान करणार.
* सर्व यात्रा पूर्वेकडील हुतात्मा चौकात सकाळी १०.०० वाजता पोहोचून यात्रेचा समारोप होणार.
* अंबरनाथमधील छोटय़ा व मोठय़ा अशा पंचवीस उपयात्रा शहराच्या विविध भागांतून निघणार आहेत.
संकलन -श्रीकांत सावंत, शर्मिला वाळुंज, शलाका सरफरे, समीर पाटणकर, संकेत सबनीस