पक्षीप्रेमींना अप्रूप असते ते पक्ष्यांच्या निरीक्षणाचे. एखादा विशिष्ट जातीचा पक्षी निदर्शनास आला की या पक्ष्याचा इतिहास शोधायचा, त्यांच्या सवयी जाणून घ्यायच्या आणि या पक्ष्याला आपलेसे करायचे हे पक्षीप्रेमींचे आवडते काम. भारतीय पक्ष्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजाती असल्या तरी परदेशी पक्ष्यांचे आकर्षण पक्षीप्रेमींमध्ये काही औरच असते. भारतात पोपट या जातीमध्ये शरीराने हिरवा आणि लाल चोच असलेला पोपटच सर्वाधिक प्रिय आहे. कायद्यानुसार भारतीय पोपटाला पाळता येत नसले तरी परदेशी पक्ष्यांना घरात पाळण्यासाठी कोणतेही बंधन नाही. याच कारणाने भारतातही वेगवेगळ्या परदेशी पोपटाच्या जातींना आपलेसे करण्यात आले. दक्षिण अमेरिकेत आढळलेल्या सन कनूर या पोपटाने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. अठराव्या शतकापासून दक्षिण अमेरिकेतील जंगलात या पक्ष्याचे वास्तव्य आढळले. वेगवेगळ्या आकर्षक रंगात आढळत असल्याने सन कनूर पोपटाने आपल्या रूपामुळे पक्षीमित्रांना भुरळ घातली आहे. सन कनूर या पोपटाला पाहताच क्षणी त्याच्या शरीरावरील गडद रंगीबेरंगी रंगाचे निरीक्षण करावेसे वाटते. या पोपटाच्या बाबतीत विशेष म्हणजे कळपात राहणारे पोपट अशी सन कनूर यांची ओळख आहे. विशेषत: पोपट म्हटले की पिंजऱ्यात एकटे किंवा जोडी पाहायला मिळते. सन कनूर पोपट मात्र जंगलात कळपाने राहतात. अलीकडे या पक्ष्यांच्या आकर्षक रंगांमुळे परदेशात मोठय़ा प्रमाणात या पोपटांचे पालन केले जाते. कॅप्टिव्हिटीमध्ये या पोपटांचे ब्रीडिंग अलीकडे होत असल्याने आणि आकर्षक रंगामुळे या पोपटांची मागणी वाढलेली दिसते. सध्या कॅप्टिव्हिटीमध्ये या पोपटांचे ब्रीडिंग होत असल्याने दक्षिण अमेरिकेतील जंगलातून दुर्मिळ होत जाणारा पक्षी असे सन कनूरबद्दल बोलले जाते.

खाद्यासाठी जंगलभर विहार

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

आहारासाठी जंगलातील फळे, फुले, ताज्या भाज्या खाण्यासाठी हे पोपट सर्वत्र विहार करतात. आकाराने लहान असले तरी संपूर्ण आहार या पक्ष्यांना लागतो. घरात पाळलेल्या सन कनूर पोपटांना संपूर्ण आहार योग्य प्रमाणात दिल्यास साधारण तीस र्वष या पोपटांचे आयुष्य असते. शंभर ग्रॅम वजन आणि सहा ते अकरा इंच या पक्ष्याची लांबी असते.

पालनासाठी सोपे

इतर पोपटांच्या प्रजातीपेक्षा सन कनूर पोपट आकाराने लहान असल्याने पालनास सोपे असतात. साधारण दोन वर्षांचे पक्षी झाल्यावर चार ते पाच अंडी घालतात. इतर पोपटांप्रमाणे सन कनूर पोपटांना बोलता येत नाही. या पोपटांचा आवाज कर्कश आहे.

दिसायला आकर्षक, रंगीबेरंगी शरीर आणि घरात असणारी कुजबुज यामुळे सन कनूर पोपट पाहताच क्षणी कुणाही पक्षीप्रेमींच्या पसंतीस पडतो. रूपवान शरीरयष्टीमुळे पोपटांच्या जातीतील सन कनूर घरातील शान मानले जातात. या पक्ष्यांची किंमत आटोक्यात असल्याने भारतातही सर्वत्र सन कनूर पोपट आढळतो.

स्वच्छ पिंजरा, मोकळी हवा आवश्यक

घरात पाळताना सन कनूर पोपट पिंजऱ्यात अधिक शोभून दिसतो. या पोपटाला ठेवण्यात येणारा पिंजरा स्वच्छ ठेवावा लागतो. हंगामी फळे या पोपटाला दिल्यास आहार पोषक ठरतो. कॅल्शिअम कमी होण्याचा आजार या पक्ष्यांना उद्भवत असतो. कॅल्शिअम कमी झाल्यास ब्रीडिंगच्या वेळी समस्या उद्भवते. पक्षी पाळणाऱ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून या पक्ष्यांवर औषधोपचार केल्यास उत्तम ठरते. रोगराईचा फारसा त्रास या पक्ष्यांना उद्भवत नाही.