20 November 2019

News Flash

परमार आत्महत्याप्रकरणी नजीब मुल्ला आणि विक्रांत चव्हाण यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या चौघांना शनिवारी सकाळी ९ वाजता ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील चारही आरोपी नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी वाढ करण्यात आली

ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला आणि विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या दोघांना शनिवारी संध्याकळी सुनावणीसाठी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर दुसरीकडे आरोपी नगरसेवकांपैकी सुधाकर चव्हाण, हनमंत जगदाळे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी केईएम रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर या दोघांना न्यायालयात हजर करायचे किंवा नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.  

परमार गुन्हा नोंदविण्यात आलेले सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हनमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे चारही नगरसेवक शनिवारी सकाळी एसीपी कार्यालयात पोलिसांना शरण आले. चारही नगरसेवकांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे चौघांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत असल्याचे सांगत शरणागती पत्करण्यासाठी अवधी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. ती न्यायालयाने मान्य करत या चौघांना शनिवारी सकाळी ९ वाजता ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. तसेच तोपर्यंत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचेही बजावले होते.

First Published on December 5, 2015 9:19 am

Web Title: suraj parmar suicide case four accused tmc corporators surrender in front of police
Just Now!
X