पायऱ्या आणि संरक्षक जाळय़ांमधील चिंचोळय़ा जागेत ‘सिंथेटिक ट्रॅक’
ठाणे परिसरातील खेळाडूंसाठी सरावाचे हक्काचे ठिकाण असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये येणाऱ्या धावपटूंची सरावापेक्षा प्रशासकीय अडथळय़ांची शर्यत ओलांडतानाच दमछाक होऊ लागली आहे. एका बाजूला संरक्षण जाळी आणि दुसऱ्या बाजूला प्रेक्षागृहाच्या पायऱ्या.. या दोन्हीतील चिंचोळय़ा जागेत उभारण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर खेळाडूंना सराव करावा लागत आहे. ऊन-पावसातही खेळाडूंना कोणत्याही त्रासाविना सराव करता यावा, या हेतूने उभारण्यात आलेला हा ‘सिंथेटिक ट्रॅक’च आता धावपटूंच्या त्रासाची सबब बनला आहे.
दादोजी कोंडदेव क्रीडांगणामध्ये धावण्याच्या सरावासाठी सिंथेटिक ट्रॅकची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. या पाश्र्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांच्या एक कोटी रुपयांच्या आमदार निधीतून ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आला. मात्र तज्ज्ञांचे मार्गदर्शन न घेता तसेच अविचारीपणे निधी खर्च करून ट्रॅक उभारण्यात आल्याचे मत क्रीडा प्रशिक्षकांनी व्यक्त केले आहे. सुरुवातीला मैदानामध्ये हा ट्रॅक तयार केला जात होता. मात्र त्यास इतर खेळांच्या प्रशिक्षकांनी विरोध केला. त्यामुळे चक्क प्रेक्षागृहात या ट्रॅकच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असलेल्या पायऱ्या आणि संरक्षण जाळी यांच्यातील अरुंद जागेत हा ट्रॅक तयार करण्यात आला. त्यामुळे सराव करताना खेळाडूंना अतिशय काळजीने धावावे लागत आहे. यात त्यांचे सातत्य आणि एकाग्रता भंग होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘वेगाने धावताना पायऱ्यांवर आणि जाळीवर आपटून खेळाडू जखमी होऊ शकतात,’ असे मत प्रशिक्षक एस. जे. अल्बर्ट यांनी व्यक्त केले. ‘ठाणे शहरातून वर्षांला दहा राष्ट्रीय अिजक्यपद प्राप्त करणारे धावपटू तयार होत असतात. या सगळ्या खेळाडूंना ठाण्यातील सिंथेटिक ट्रॅक उभारण्याविषयी मोठी अपेक्षा होती, मात्र खेळाडूंचा अपेक्षा भंग झाला,’ अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांनी दिली.

मैदानामध्ये ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू असताना येथील प्रशिक्षकांनी त्याला विरोध दर्शवला, त्यामुळे साहाय्यक आयुक्तांनी हे काम थांबवून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. मात्र आयुक्तांनी भेट दिली त्या वेळी एकही प्रशिक्षक तेथे उपस्थित नव्हते. प्रशिक्षकांच्या मागणीनुसारच प्रेक्षागृहामध्ये हा ट्रॅक बनवण्यात आला आहे. हा ट्रॅक स्पर्धेसाठी नसून तो सरावासाठी असून त्यावरून पावसाळ्यातही सराव करणे शक्य होणार आहे. त्यामुळे अडचण उभी राहण्याचा प्रश्नच नाही.
– मीनल पालांडे, क्रीडा अधिकारी, ठाणे महापालिका

Which teams will qualify for playoffs
IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

वीस वर्षांची प्रतीक्षा, कोटय़वधीचा खर्च आणि शहरातील पहिलाच सार्वजनिक ट्रॅक असल्याने हा ट्रॅक तयार होण्यासाठी ठाण्यातील सगळ्याच क्रीडाप्रेमींनी जोर धरला होता. मात्र हा ट्रॅक तयार झाल्यानंतर ‘खोदा पहाड निकला चूहा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण अत्यंत अरुंद, अर्धवर्तुळाकार आणि अडचणींचा ट्रॅक बनला असून यावर इतके पैसे खर्च का केले, असा प्रश्न पडतो.
– चंद्रकांत सोंडकर, प्रशिक्षक