युगुलांकडून होणाऱ्या असभ्य वर्तनाने पादचाऱ्यांची मान खाली

ठाण्यातील शांत परिसर असलेल्या उपवन तलावाच्या काठावर बसणाऱ्या प्रेमीयुगुलांकडून होणाऱ्या असभ्य वर्तनाबद्दल तक्रारी येत असतानाच शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावाच्या परिसरातही असेच प्रकार पाहायला मिळत आहेत. तलावपाळीच्या कठडय़ावर बसून अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींमुळे या भागातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना मान खाली घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.

Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
Dahanu, Fishermen, Catches, Ghol Fish, Worth Lakhs, Valuable, sea, marathi news,
डहाणूच्या मच्छीमारांच्या जाळ्याला लाखोंचा घोळ
instead of Kripal Tumane Raju Parve got Candidacy from Ramtek
शिंदेसोबत जाण्याच्या निर्णयाने तुमानेंची अवस्था ‘तेलही गेले अन् …’

तलावपाळी हा परिसर ठाणेकर नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी जिव्हाळ्याचा आहे. मासुंदा तलावाकाठी असणाऱ्या पादचारी पुलावर चालण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी नागरिक मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. सुट्टीच्या दिवशी  या ठिकाणी आबालवृद्धांची गर्दी असते. अशा वेळी तलावाच्या कठडय़ावर बसून प्रेमीयुगुलांकडून असभ्य वर्तन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मध्यंतरी पोलिसांनी सायंकाळच्या वेळेस या भागात गस्त वाढवल्याने हा प्रकार कमी झाला. मात्र, आता सकाळी आणि दुपारी तलावपाळीवर अशा प्रेमीयुगुलांची गर्दी जमू लागली आहे. अनेकदा महाविद्यालयीन गणवेशातच तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असतात. अशा परिस्थितीमुळे तलावपाळीलगतच्या पदपथावरून चालणेही नागरिकांना कठीण वाटू लागले आहे. लहान मुले सोबत असल्यास या परिसरातून चालणे चुकीचे वाटते, असे तलावपाळी परिसरात चालण्यासाठी येणाऱ्या मंगला सातपुते यांनी सांगितले.

उद्यानातही परिस्थिती सारखीच

  • तलावपाळी परिसराजवळच नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी उद्यानातही प्रेमी जोडप्यांचे असभ्य वर्तन सुरू असते.
  • उद्यानातून मुख्य रस्त्यावर ये-जा करण्यासाठी रस्ता असल्याने अनेकदा नागरिक पादचारी पुलाऐवजी या उद्यानातून मार्गक्रमण करतात. मात्र या उद्यानात नेहमीच प्रेमी जोडपी असभ्य वर्तन करताना आढळतात, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

तलावपाळी परिसरात पोलिसांची वाहने, बिट मार्शल फिरत असतात. सकाळच्या वेळेतही पायी गस्त सुरू असते. मात्र अनेकदा १८ वर्षे पूर्ण झाल्याचे कारण तरुणांकडून सांगण्यात येते. तरीही असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणांना वेळोवेळी हटकण्यात येते.

चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे