News Flash

तलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक

अशरफ यांनी लाचलुचपत विभाग ठाणे येथे तक्रार केली होती. 

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

भाईंदर : जमिनीवरील सात बाऱ्यावर फेरफार करण्याकरिता ६० हजाराची लाच मागितल्याच्या आरोपावरून उत्तन येथील तलाठय़ासह दोघाना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली.

उत्तनचे रहिवासी मोहम्मद अशरफ यांनी उत्तनच्या तलाठी कार्यालयात सात बारा नावावर नोंदविण्यासाठी अर्ज केला होता. येथील तलाठी उत्तम शेंडगे आणि तक्रारदार अशरफ यांच्यात मध्यस्थी करणारे समीर मुजावर यांनी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या नावे ६० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे अशरफ यांनी लाचलुचपत विभाग ठाणे येथे तक्रार केली होती.

गुरुवारी निरीक्षक शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला आणि २० हजार रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारताना समीर मुजावरला अटक केली. तलाठी शेंडगे यांनाही ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:29 am

Web Title: talathi arrested for taking bribe zws 70
Next Stories
1 करोनाबाधितांची संख्या दीड लाखावर
2 पोलीस करोनाच्या विळख्यात
3 करोनाकाळातील साहित्य खरेदी वादात
Just Now!
X