भाषा ही भाषा असते. ती कधीही अशुद्ध नसते. अलीकडे मुलांनी शाळेत प्रमाण भाषा, बोलीभाषेचा वापर केला तर मातृभाषेचा काडीचाही गंध नसलेली शिक्षक मंडळी त्या मुलांना शुद्ध बोल म्हणून गप्प करतात. यामधून विद्यार्थ्यांमध्ये बोलायचे कोणत्या भाषेत, असा न्यूनगंड तयार होतो. भाषाशुद्धीच्या नावाने एक उमदी पिढी बिघडविण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे, अशी खंत संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक प्रा. राजन गवस यांनी डोंबिवलीत रविवारी ४५ व्या महानगर मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केली.

मुंबई मराठी साहित्य संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखा यांच्यातर्फे डोंबिवलीत महानगर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्या वेळी प्रा. गवस बोलत होते. ज्येष्ठ कवयित्री प्रा. नीरजा, प्रा. उषा तांबे, आमदार रवींद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष माधव जोशी, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, वामन देशपांडे, सुरेश देशपांडे, प्रा. धनश्री साने, उज्ज्वला मेहेंदळे उपस्थित होते.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..

‘राजकीय इच्छाशक्तीचा अभाव’ :  बहुतांशी विद्यापीठांचे कुलगुरू विज्ञान शाखेचे पदवीधर असतात, त्यांना मराठीविषयी कणव वाटत नाही. मराठीविषयी कणव असलेला नेता यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर झाला नाही. चव्हाण यांच्या काळात अनेक साहित्यिक संस्था आकाराला आल्या. आता अशी राजकीय इच्छाशक्ती कोठे दिसत नाही. मराठी भाषेसाठी वेगळे विद्यापीठ करायला विरोध केला जात आहे. अशा पद्धतीने आपणच मराठीचा गळा घोटत आहोत, असे प्रा. गवस यांनी सांगितले.