जिल्ह्य़ाच्या तापमानामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली असून गुरुवारी जिल्ह्य़ाचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस इतके असल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्य़ातील शहरांमध्ये शहापूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच ४१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्य़ातील शहरांचा पारा आता ४० अंशावर पोहचल्याने उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून या उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ठाणे जिल्ह्य़ामध्ये एरवी कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस इतके असते. मात्र, फेब्रुवारी महिनाअखेरपासून जिल्ह्य़ाच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्य़ाचे तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके होते. त्यामध्ये गुरुवारी आणखी वाढ होऊन ते ४१ अंश सेल्सिअस इतके झाले आहे. जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत आद्र्रताही वाढली असून यामुळे या सर्वच ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे.
जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गुरुवारी ४० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर, भिवंडी आणि डोंबिवलीत मात्र त्या तुलनेत कमी तापमान असून याठिकाणी ३९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंद झाले आहे. जिल्ह्य़ातील इतर भागांच्या तुलनेत शहापूरमध्ये मात्र सर्वाधिक तापमान असल्याचे समोर आले असून याठिकाणी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. उष्ण वातावरणामुळे उकाडा वाढला आहे.
जिल्ह्य़ाचे तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
शहर तापमान
दोन दिवसांपूर्वी आता
ठाणे ३९ ४०
डोंबिवली ३९ ३९
कल्याण ४० ४०
भिवंडी ३९ ३९
शहापूर ४० ४१
उल्हासनगर ३९ ४०
अंबरनाथ ४० ४०
बदलापूर ४० ४०
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 5, 2021 12:26 am