News Flash

पालघरच्या ग्रामीण भागात करोना व्हायरसचे १० नवीन रुग्ण

मागच्या दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता.

प्रतिकात्मक छायाचित्र

मागच्या दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. पण काल रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालघर तालुक्यातील आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या दोघांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

पालघर तालुक्यातील काटाळे या गावी वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला करोनाची बाधा झाली होती. मात्र त्या मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा व येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. काटाळे येथील वीट भट्टी संदर्भात पाच नवीन रुग्ण आढळले असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना (इंटरन्स) करोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे.

डहाणू येथे लहान मुलीला करोनाची लागण झाल्याने पालघर तालुक्यातील काटाळे, लोवरे, वांदिवली-खरशेत या गावांच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये आरोग्य सेवकांच्या मार्फत घरोघरी पाहणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कासा येथील उपविभागीय रुग्णालय सील करण्याचा आरोग्य विभाग विचार करत आहे.

याखेरीज  उसरणी गावातील दोन तर सफाळे डोंगरी येथे श्वसनाचा विकार असणाऱ्या रुग्णाला करोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अचानकपणे एकाच दिवसात १० रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागासाठी प्रशासकीय यंत्रणांसाठी डोकेदुखी वाढणार आहे. या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील ४२ नागरिकांचे नव्याने विलगीकरण करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 7:32 am

Web Title: ten new corona positive patient find in palghar district dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : जिल्ह्यात ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक करोना रुग्ण
2 ठाण्यात १७ घाऊक भाजी बाजार
3 समुदाय स्वयंपाकगृहाच्या उद्घाटनात सामाजिक अंतराची ऐशीतैशी
Just Now!
X