22 November 2019

News Flash

अंबरनाथमध्ये तणाव

अंबरनाथच्या पश्चिम भागातील अल्पसंख्यबहुल वुलन चाळ परिसरात गोमांसाची विक्री सुरू असल्याचा आरोप करत मंगळवारी दुपारी प्राणीमित्र ...

| August 12, 2015 12:01 pm

अंबरनाथच्या पश्चिम भागातील अल्पसंख्यबहुल वुलन चाळ परिसरात गोमांसाची विक्री सुरू असल्याचा आरोप करत मंगळवारी दुपारी प्राणीमित्र संघटनेचे कार्यकर्ते केतन शर्मा यांनी येथील काही दुकानांवर पोलिसांसह धाडी टाकल्या. यावेळी स्थानिक अल्पसंख्याक आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. अंबरनाथ पश्चिम भागात   गोवंश हत्या बंदी कायदा लागू होण्यापूर्वी  मोठय़ा प्रमाणावर गाय आणि बैलाच्या मांसाची विक्री केली जात होती. मात्र राज्यात गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतर येथे ही विक्री करणे बंद झाले होते. मात्र तरीही काही विक्रेते छुप्या पद्धतीने ही विक्री करत असल्याच्या गुप्त माहितीवरून मंगळवारी प्राणीमित्र संघटनेचे केतन शर्मा हे या भागात पोहोचले. तेथे त्यांनी प्रत्येक मांसविक्री करणाऱ्या दुकानाची पोलिसांसह तपासणी सुरू केली. यावेळी त्यांनी काही मांस जप्तही केले. मात्र यादरम्यान, या दुकानांबाहेर अल्पसंख्य समाजाचा मोठा समुदाय जमा होऊन त्यांच्यात आणि या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.

First Published on August 12, 2015 12:01 pm

Web Title: tension in ambernath
टॅग Tension
Just Now!
X