बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत वसलेल्या घोडबंदर गावात बिबटय़ाचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच या बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीला लागूनच घोडबंदर गाव वसले आहे. अनेक वेळा उद्यानाची हद्द ओलांडून बिबटे रात्री-अपरात्री गावात शिरत असल्याच्या घटना या आधीदेखील घडल्या आहेत. मात्र सध्या बिबटय़ा सायंकाळच्या वेळी येत असल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. गावात असलेल्या सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात बिबटय़ा गावात बिनधास्तपणे फिरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

या बिबटय़ाचा तातडीने बंदोबस्त करावा, असे पत्र घोडबंदर गावातील रहिवासी आणि उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनअधिकारी तसेच नागपूर येथील वनविभाग कार्यालयाकडे केली आहे.

या ठिकाणी बिबटय़ाचा वावर

बिबटय़ाचा वावर साधारणपणे दत्त मंदिर, मॉडर्न कंपनी वसाहत, साईनाथ सेवानगर झोपडपट्टी, नेहरूनगर, बामणदेव या रहिवासी क्षेत्रातच आहे