News Flash

ठाणे : ड्रेनेज लाइनच्या खड्ड्यात कार कोसळली, चालकाचा मृत्यू

घटनेमुळे नागरिकांकडून संताप, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ठाण्यातील घोडबंदर रोडजवळ मुल्ला बाग येथे नवीन ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात एका कारचा कोसळून अपघात झाला आहे. बुधवारी (15 मे) सकाळी झालेल्या या अपघातात कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन काकोडकर हे त्यांच्या मारूती सुझुकीच्या कारने निलकंठ ग्रीन्सकडून घोडबंदर रोडकडे जात होते. मुल्ला बाग बस डेपोजवळ काकोडकर यांची कार आली असता ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्यांची कार कोसळली. गंभीर जखमी झालेले काकोडकर कारमध्येच अडकले. त्यानंतर खड्ड्यात कार उलटल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन एक इमर्जन्सी टेंडर आणि रेस्क्यू वाहनाच्या सहाय्याने ही कार खड्ड्यातून बाहेर काढली. त्यानंतर जखमी काकोडकर यांना बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मुल्ला बाग बस डेपोजवळ इगल कन्स्ट्रक्शनद्वारे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 12:10 pm

Web Title: thane accident car fallen into drainage hole one died
Next Stories
1 पाण्यासाठी जीवघेणी रूळवारी!
2 मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावर लुटारूंची टोळी
3 बदलापूरच्या जांभूळ आख्यानाची अखेर?
Just Now!
X