02 December 2020

News Flash

‘आर्टिस्ट हब’- सामान्य कलाकारांचे व्यासपीठ

प्रत्येक महिन्याला एका वेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल

या व्यतिरिक्त आर्ट लायब्ररी नावाची एक अभिनव संकल्पना देखील यात असणार आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये प्रत्येक महिन्याला एका वेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल.

समाजातील सामान्य स्तरातील कलाकारांसाठी आजही हवी तशी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक कलाकार आणि त्यांच्या कलाकृती दुर्लक्षित राहतात. अशा कलाकारांसाठी शनिवारी (दि.१५) जागतिक कला दिनाच्या निमित्ताने आर्टिस्ट हब डॉट ऑनलाईन (www.artisthub.online) हे वेब पोर्टल मुंबई आणि ठाणेकरांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरु होत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून व्यावसायिक व अव्यावसायिक कलाकार, शिल्पकार, हस्तकलाकार आणि कलाप्रेमी आपल्या कलाकृती जागतिक स्तरावर प्रदर्शित करू शकतात. या माध्यमातून लोकांना हव्या त्या कलाकृती घरबसल्या विकत घेता येणार आहेत. ठाण्यातील द होरायझन टेक्नॉलॉजीज या संस्थेने हे पोर्टल विकसित केलेले असून मयूर दाभाडे, स्वप्नील दाभाडे आणि हृषीकेश देसाई या तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

या व्यतिरिक्त आर्ट लायब्ररी नावाची एक अभिनव संकल्पना देखील यात असणार आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये प्रत्येक महिन्याला एका वेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल. “सध्या ही ऑनलाईन आर्ट लायब्ररी मुंबई व ठाणेकरांसाठी प्रायोगिक स्तरावर खुली करण्यात आली असून यासाठीचा प्रतिसाद बघून ही संकल्पना सर्वत्र राबवण्याचा आमचा मानस आहे.” अशी माहिती मयूर दाभाडे यांनी दिली. तसेच कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि पर्सनलाईज्ड मर्चन्डाईस देखील आर्टिस्ट हबवर उपलब्ध असतील. व्यावसायिक कलाकारांकडून तुमचं स्केच काढून देण्यापासून ते अगदी तुमच्या नेमप्लेट पर्यंतच्या पर्सनलाईज्ड सेवा या पोर्टल वर उपलब्ध असणार आहेत. बऱ्याचदा आपण आपल्या प्रियजनांचे जन्मदिवस विसरतो आणि त्यांचा रुसवा आपल्याला सहन करावा लागतो. यासाठी आर्टिस्ट हब ‘हॅपी बर्थडे’ नावाची एक संकल्पना राबवत आहे ज्यात तुमच्या प्रियजनांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट्स पोहोच करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 3:35 pm

Web Title: thane artist hub web portal for common artist
Next Stories
1 ‘साहेबांची पोरं लय भारी, बिना बैल घोड्याची हकलली गाडी’
2 मधमाश्यांच्या हल्ल्यात पादचाऱ्याचा मृत्यू
3 राज्यातील डॉक्टरांची मणिपूरमध्ये रुग्णसेवा
Just Now!
X