मुंबई-नाशिक महामार्गावर बस आणि वॅगनार कारमध्ये झालेल्या अपघातात भाजपाचे ठाणे उपाध्यक्ष गुरुनाथ वामन लसने यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मुबंई नाशिक महामार्गावरील सरावली पाडा येथून गुरुनाथ हे सायंकाळच्या सुमाराला भिवंडीवरून घरी परतत होते. त्याच सुमारास विरुद्ध दिशेने जाणाऱ्या खाजगी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने गेली असता त्याच वेळी गुरुनाथ यांच्या कारला बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार आणि बस रस्त्यालगत असलेल्या खोलगट भागात जाऊन आदळल्या. या अपघातात गुरुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला तर खाजगी बसमधील 15 ते 20 प्रवासी बचावले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 7:21 pm