News Flash

ठाणे.. काल, आज, उद्या

जलस्रोत ते विरंगुळा ठाणे हे तलावांचे शहर मानले जाते. यातील काही तलावांमधून पूर्वी परिसरातील विभागांना पाणीपुरवठा होत होता. येऊरच्या पायथ्याशी असलेला उपवन तलाव त्यापैकीच एक.

| July 7, 2015 04:37 am

जलस्रोत ते विरंगुळा
ठाणे हे तलावांचे शहर मानले जाते. यातील काही तलावांमधून पूर्वी परिसरातील विभागांना पाणीपुरवठा होत होता. येऊरच्या पायथ्याशी असलेला उपवन तलाव त्यापैकीच एक. या तलावाचे वैशिष्टय़ म्हणजे तो नैसर्गिक नाही. कृत्रिमरीत्या खोदण्यात आला आहे. १८८१ मध्ये नगरपालिकेने हा तलाव खोदला. या तलावाचे एकूण क्षेत्रफळ ४ लाख २९ हजार ४०० चौरस फूट आहे. तलाव खोदण्यासाठी नगरपालिकेने ८ हजार ४६३ रुपये खर्च केले. उर्वरित निधी लोकवर्गणीतून गोळा करण्यात आला. या तलावाचे उद्घाटन सर फग्र्युसन जेम्स यांनी केले. सध्या मासुंदाप्रमाणेच उपवन तलाव परिसरही ठाणेकरांच्या विरंगुळ्याचे एक प्रमुख केंद्र आहे.
(जुने छायाचित्र सदाशिव टेटविलकर यांच्या संग्रहातून) नवे छायाचित्र-दीपक जोशी

ठाणे काल, आज, उद्या
वाचकांच्या नजरेतून..
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांचा भूतकाळ दाखवणारी अशी छायाचित्रे तुमच्याकडे असल्यास आम्हाला जरूर पाठवा. भूतकाळातील ही छायाचित्रे आणि त्यासोबत आजच्या छायाचित्राला या सदरातून तुमच्या नावानिशी प्रसिद्धी दिली जाईल. छायाचित्र पाठवताना संबंधित ठिकाण, छायाचित्राचे वर्ष, तुमचे नाव आणि संपर्क क्रमांक यांसह छायाचित्र कुठून मिळवले हे सांगण्यास विसरू नका.  छायाचित्रे newsthane@gmail.com या ई मेलवर पाठवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 4:37 am

Web Title: thane city history 2
Next Stories
1 शाळेच्या बाकावरून : एकलव्यांचा आधारवड
2 साहित्य-संस्कृती :कला, शास्त्राचे अंतिम टोक एकच!
3 वसाहतीचे ठाणे : सत्तरच्या दशकातील शांतता, सौंदर्याचे जतन
Just Now!
X