१७ ते १९ मे दरम्यान ठाणे महापालिकेच्या योजनांमधून शहराला पाणीपुरवठा होणार
ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवार १७ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार १९ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये मंगळवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इंटर्निटी या परिसरात पाणीपुरवठा सुरू राहील. तर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. बुधवार १८ मे रोजी सकाळी ९ ते गुरुवार ५ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या पाणीबंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

औद्योगिक महामंडळाचा पाणी पुरवठा ६० तास बंद
ठाणे शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार १८ मे रोजी सायंकाळी ६ ते शनिवार २१ मे रोजी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्रमांक -१ या परिसराचा पाणीपुरवठा (६० तास) बंद राहणार आहे.

Bhandara district, enthusiastic voters, hot sun, 34 percent polling, till 1 pm, bhandra lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, bhandara polling news, marathi news, polling day, voters, voters in bhandara,
भंडारा जिल्ह्यात तळपत्या उन्हातही मतदारांमध्ये उत्साह….दुपारी १ पर्यंत ३४.५६ टक्के मतदान…
water supply through tankers
दुष्काळ ; ५,००० गावे टँकरग्रस्त
दत्ता जाधव possibility of light rain across maharashtra for four days from 5 april
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज
Thane, Traffic Police Implement, Traffic Changes, Ghodbunder Road, Metro Line Construction, marathi news,
मेट्रो कामांमुळे घोडबंदर मार्गावर मध्यरात्री वाहतुक बदल