News Flash

भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात पाच वर्षाची शिक्षा

२०१४ मध्ये गाळ्याची उंची वाढवण्याकरिता एक लाख ६० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते

भाईंदर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांना ठाणे न्यायालयाकडून पाच वर्षाची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. वर्षा भानुशाली यांना २०१४ रोजी ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होते.

वर्षा भानुशाली यांनी ६ जून २०१४ मध्ये एका गाळ्याची ऊंची वाढवण्यासाठी व दुरुस्तीप्रकरणी एक लाख साठ हजार रुपये लाच मागितली होती. त्याचा पहिला हप्ता घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भानुशाली यांना रंगेहाथ पकडले होते. जानकी हेरिटेज या त्यांच्या राहत्या घरातून  ५० हजार रुपये घेताना त्यांना पकडण्यात आलं होतं.

याप्रकरणी ठाणे न्यायालयाने त्यांना पाच वर्षाचा कारावास व पाच लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. भानुशाली या २००७ मध्ये भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सोबत एकाच पॅनलमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. आता देखील त्या भाजपाच्या नगरसेविका असून भाईंदर पश्चिमच्या मुर्धा, राई, मोरवा,आंबेडकर नगर व दीडशे फूट भागातून प्रभाग २३ मधून निवडून आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 12:36 pm

Web Title: thane court bjp bhayander corporator varsha bhanushali sgy 87
Next Stories
1 अपंग, विशेष मुलांची उपेक्षा
2 नगरविकास कार्यालयात सर्वसामान्यांना प्रवेशबंदी
3 वसईच्या मराठमोळ्या नाताळ सणावर इंग्रजीची झालर
Just Now!
X